महावितरण अधिक्षक अभियंत्यांचा दणका; ठेकेदाराकडून होणाऱ्या पिळवणुकीच्या चौकशीचे आदेश

महावितरण अधिक्षक अभियंत्यांचा दणका; ठेकेदाराकडून होणाऱ्या पिळवणुकीच्या चौकशीचे आदेश

General Distribution Superintending Engineer’s bump; Order of Inquiry into Extortion by Contractor

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onTue 25 April23 ,18.00 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव अर्बन व ग्रामीण महावितरण कंत्राटी कामगाराच्या होणाऱ्या आर्थिक  पिळवणुकीच्या संदर्भात चौकशी करावी, असे आदेश  अधिक्षक अभियंता नगर, प्रकाश जमधडे यांनी दिले आहेत. यामुळे सब इंजिनिअरच्या दोन पॅनल खाली कोपरगाव मंडला मधिल ग्रामीण व अर्बन कंत्राटी कामगाराचे जबाब नोंदवण्यात येणार  आहे. याबाबत साई सेवा प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष रमेश भोगंळ  यांनी अधिक्षक अभियंता,नगर यांच्यासह शासन दरबारी मंत्रालयात कंत्राटदाराच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या.

10 वर्षांचे टेंडर कोपरगाव ग्रामीणचे ऐके मार्केटिंग नाशिक तर शहराचा के पी पवार मार्केटिंग संगमनेर ‘या’ कंपनीकडे आहे कोपरगाव महावितरण कंपनीत वेगवेगळ्या कामांसाठी 91 कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. यासाठी ठेकेदारांची नियुक्ती करून त्याच्याकडून कर्मचारी सेवा घेतली जाते. या ठेकेदारास महावितरण  एकरकमी पैसे देते व तो ठेकेदार कर्मचाऱ्यांना वेतन देतो. मात्र, यात ठेकेदाराकडून नियमांचे पालन केले जात नाही व या कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण केले जाते, अशा तक्रारी या कर्मचाऱ्यांनी साई सेवा प्रतिष्ठान संस्थेकडे केल्या होत्या. त्याची दखल घेत, या संस्थेचे अध्यक्ष रमेश भोंगळ यांनी अधिक्षक अभियंता प्रकाश जमधडे नगर यांची भेट घेतली. कामगारांना किमान वेतन दिले जात नाही. पगार करण्यापूर्वी त्यांच्याकडून साडेतीन हजार रुपये खात्यात भरून घेतले जातात त्यानंतर त्यांचा पगार केला जातो जे साडेतीन हजार रुपये आधी भरणार नाहीत त्यांचा पगार केला जात नाही हे बेकायदेशीर असून, या कंत्राटी कामगारांना किमान दहा लाखाचे विमा संरक्षण कवच असावे  अशी मागणी ही  भोंगळ यांनी त्यांच्याकडे केली होती .  कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. ठेकेदारांकडून कामगारांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जात आहे.महावितरण   प्रशासनाकडून ठेकेदारांना पाठीशी घातले जात आहे.
 महावितरण चे 80% काम  या कंत्राटी कामगारावर अवलंबून आहे  पगार वेळेवर मिळत नसल्यामुळे  त्यांची मानसिक स्थिती बिघडत असून यामुळे  वितरण सेवा  विस्कळीत होत आहे. कामगारांना वेतन स्लीप दिली जात नाही.  याबाबी त्यांनी अधीक्षक अभियंता नगर यांच्या  नजरेस आणून दिल्या. अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे यांनी  दखल घेत चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे त्यांनी सब इंजिनिअरच्या दोन पॅनल खाली कोपरगाव मंडला मधिल ग्रामीण व अर्बन कंत्राटी कामगाराचे जबाब नोंदवण्यात येणार  आहे.कामगारांनी कुठल्याही परिस्थितीत दबावाला बळी न पडता आपल्या वर होणाऱ्या अन्यायाचा लेखी जबाब पँनल पुढे नोदंवण्यात यावा असे कळकळीचे आवाहन भोंगळ यांनी केले आहे . मर्जीतील दोन ठेकेदारांना टेंडर विभागून दिले,  असल्याची तक्रार  भोंगळे यांनी केली आहे.

चौकट 

मागील वर्षी  कोकणठाण शिवारातील विद्युत पोलवर लिंक टाकण्याचे काम करीत असताना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने पोलवर काम करणारे  कंत्राटी कामगार निलेश शेलार (वय 25)रा. टाकळी यांचे विजेच्या धक्क्याने निधन झाले कंत्राट दाराने  अपघाती विमा उतरवला नसल्यामुळे त्यांच्या वारसांना  विमा सुरक्षा कवचाचा लाभ मिळाला नाही त्यावेळी इतर कंत्राटी कामगारांनी वर्गणी करून त्यांच्या घरच्यांना एक ते दीड लाखाची मदत केली असेही भोंगळ सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page