रेल्वेगाडीत चढताना खाली पडून तरुणाचा मृत्यू

रेल्वेगाडीत चढताना खाली पडून तरुणाचा मृत्यू

A young man died after falling down while boarding a train

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu23 May23 ,16.50. Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या २नंबर प्लॅटफॉर्मवर  धावत्या रेल्वेगाडीत चढताना खाली पडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी  दुपारी १ वाजताच्या सुमारास कोपरगाव रेल्वेस्थानकावर घडली. सोमनाथ  चंद्रकांत म्हस्के (वय २५, रा.मार्केट यार्ड बौद्ध विहार ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

सोमनाथ हा कोपरगाव रेल्वे स्थानकावरून  पुणे पॅसेंजरने कोपरगाववरून अहमदनगर येथे कामानिमित्ताने जायचे होते . दुपारी एक वाजता च्या सुमारास  कोपरगाव रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म दोन नंबरवर उभी असलेली   रेल्वेगाडी सुरू झाल्याने सोमनाथ याने  चालत्या आपल्या बोगीकडे धाव घेतली. मात्र, सोमनाथ हा गाडीत चढण्याच्या प्रयत्नात पाय घसरून बोगीच्या खाली आला. मोठा पघात झाला होता हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे या अपघातात  सोमनाथ  चंद्रकांत म्हस्के हा गंभीर जखमी झाला होता.
सदर जखमी सोमनाथ याला रेल्वे पोलीस आंबेकर,शिंदे,शेख यांनी तत्काळ १०८   क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिलेला कळविले मात्र ती उपलब्ध होत नसल्याने खाजगी रुग्णवाहिका चालक  अमित खोकले यांना फोन करत घटनास्थळी बोलावून घेत रेल्वे पोलीस स्थानिक सफाई कर्मचारी तसेच खडकी येथील  संतोष कांबळे यांच्या मदतीने  खाजगी रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते सदर तरुणावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तो गंभीर जखमी असल्याने त्याला खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते मात्र उपचारकरण्यापूर्वीच हा युवक मयत झाल्याचे समजते सदर घटनेने तालुक्यात एकच हळहळ व्यक्त होत आहे.
 दरम्यान  रेल्वे पोलीस अधिकारी आंबेकर त्यांचे सहकारी यांनी रुग्णालयात येवून पंचनामा केला असून पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page