कोपरगाव पहिल्या मोक्का खटल्यातील ४ आरोपींची निर्दोष मुक्तता
Acquittal of 4 accused in Kopargaon 1st Mokka case
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu23 May23 ,16.40. Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या ४ आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले आहे. मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती स.बा. कोराळे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. उपलब्ध साक्षी, पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
राहाता तालुक्यातील साकुरी येथील हॉटेल बांबु हाउसवर झालेल्या दरोडा प्रकरण व त्या प्रकरणावरुन आरोपींवर लागलेला महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे (मोक्का) अंतर्गत १९ नोव्हेबर २०१७ रोजी राहाता पोलीस ठाण्यात मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. आरोपीविरुद्ध आय.पी.सी. कलम ३९७, ३९२, ३४ मोक्का कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) व भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दिपक अंबादास पोकळे, रामनाथ उर्फ दादू गोरख मोरे, अक्षय अप्पासाहेब दाभाडे, किशोर चांगदेव दंडवते अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपींवर जवळ शस्त्र बाळगुन दरोडा
टाकण्याच्या गुन्ह्यात मोक्का लावण्यात आला होता.आरोपींच्या विरोधात फिर्याद व जबाब यातील विसंगती आरोपींची ओळख परड झालेली नाही.सादर केलेले पुरावे आणि साक्षीदार हे सबळ नव्हते. ते विश्वासपात्र नसल्याने आरोपींना संशयाचा आणि सबळ पुरावे नसल्याचा फायदा देत निकाल देण्यात आला. मोक्का आरोपांशिवाय आरोपींच्या विरोधात कुठलेच प्रकरण आक्षेपार्ह नाही. त्यामुळे त्यांना संशयाचा फायदा देणे क्रमप्राप्त आहे, असे न्यायालयाने सांगितले.
फिर्यादी पक्षातर्फे १८ महत्वपूर्व साक्षीदार तपासण्यात आले. परंतु एवढया मोठा खटल्यात सरकार पक्ष कोणत्याही कलमांतर्गत गुन्हा शाबीत करु शकले नाही.सदरच्या खटल्यात मुख्य आरोपी दिपक अंबादास पोकळे याचे वतीने ॲड. शंतनु धोर्डे यांनी कामकाज पाहिले.त्यांचा युक्तीवाद महत्वाचा ठरला आहे. तर किशोर चांगदेव दंडवते ॲड.जयंत जोशी यांनी तर रामनाथ उर्फ दादू गोरख मोरे व अक्षय अप्पासाहेब दाभाडे, या दोघांच्या वतीने ॲड.बी.एन. गंगावणे यांनी कामकाज पाहिले. कोपरगाव येथील विशेष मोक्का न्यायालयात सुमारे सहा वर्षे चाललेल्या पहिल्या मोक्का खटल्यातील सर्वचे सर्व आरोपी निर्दोष सुटले.
Post Views:
178