दोन गावठी दारू अड्डयावर कोपरगाव शहर पोलिसांचा छापा; ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त

दोन गावठी दारू अड्डयावर कोपरगाव शहर पोलिसांचा छापा; ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Kopargaon city police raid two Gavathi liquor dens; 43 thousand seized

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu23 May24 ,17.50. PmBy राजेंद्र सालकर

कोपरगाव : तालुक्यातील मनाई वस्ती, शिंगणापुर परिसरात बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या गावठी दारूच्या दोन अड्डयावर कोपरगाव शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर अचानक धाडसत्र सुरू केल्याने हातभट्टी चालकांचे धाबे दणाणले आहे. कोपरगाव शहर पोलिसांनी  येथील मनाई  वस्तीजवळील नारांदी नदीचे पात्रालगत काटवनात बुधवारी (२४मे)  रोजी सकाळी ६.४० ते ९.४५ चे सुमारास ३ तासात  दारूच्या दोन वेगवेगळ्या अड्डयावर छापा टाकून ४३ हजार  रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.   

अनेक दिवसांपासून तालुक्यातील मनाई वस्ती, शिंगणापुर परिसरातहातभट्ट्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलिस उपनिरीक्षक भरत दाते यांना गुप्त माहितीच्या आधारावर सुगावा लागताच शहर पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.  एस आर शेवाळे, पोहेकॉ. राजेंद्र  पुंड, पण. कॉ. गणेश शेवाळे पो. कॉ. भारत खेमनर, पो.ना. राम खारतोडे, म.स.फौ.एन बी गलांडे यांनी  छापा टाकला. यात काटवनात हातभट्टी सुरू असल्याचे निदर्शनास येताच उपनिरीक्षक दाते यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घेराव घालून त्यांच्या ताब्यातील गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी  लागणारे आंबट उग्रट वास येत असलेले,४३० लिटर कच्चे रसायन शंभर रुपये लिटर प्रमाणे  ४३ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी श्रावन भरत गायकवाड (वय २५) धंदा मजुरी रा. मनाई वस्ती (अटक)  व नानासाहेब कारभारी  गायकवाड  रा. मनाई वस्ती, (फरार)  यांच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. 

कोट 

गावठी दारूच्या सेवनाने शेकडो लोकांचा राज्यात बळी गेला आहे. मनाई  वस्तीजवळील नारांदी नदीचे पात्रालगत काटवनात हातभट्टी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच कारवाई केली आहे. नागरिकांनी माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांना कळवावे. आगामी काळात परिसरातील हातभट्ट्यांवर अशीच कारवाई करण्यात येईल.” – शहर पोलिस उपनिरीक्षक भरत दाते

Leave a Reply

You cannot copy content of this page