निवारा श्री स्वामी समर्थ केंद्रात: पादुका पूजन व महाआरतीसह अनेक विधी   

निवारा श्री स्वामी समर्थ केंद्रात: पादुका पूजन व महाआरतीसह अनेक विधी   

At Nivara Sri Swami Samarth Kendra: Various rituals including Paduka Poojan and Mahaarti

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun28 May24 ,17.50. Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : प. पु. गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने चंद्रकांत दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाने आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक अंतर्गत श्री स्वामी समर्थ विजय रथ, शनिवारी सायंकाळी ६वा. (२७ मे) शहरातील निवारा  येथील श्री  स्वामी समर्थ केंद्रात आगमन झाले. रविवारी सकाळी ८ वाजेच्या भूपाळी आरती नंतर पादुका पुजन व धान्य पुजन  सायंकाळी ५ वाजेनंतर  करण्यात आले.

पादुका पुजनाचे फायदे • कपादुकांवर पंचामृत अभिषेक आणि नवधान्य अभिषेक होणार आहे. • पंचामृत अभिषेकाने विद्या अभ्यासात प्रगती होते, नोकरीच्या समस्या मार्गी लागतात, बढती होते, यश प्राप्ती होते.
 
पादुका पूजनाचे महत्त्व • कुलदेवता, कुलदैवतचा कोप नाहिसा होतो, पितृदोष नाहिसे होतात. • घरात सुखशांती लाभते पती-पत्नी मधील वादविवाद नाहिसे होवून संसार सुखी होतात. • पूजनानंतर श्रींच्या पादुका डोक्यावर ठेवल्या जातात त्यामुळे सर्व व्याधींचे निवारण होते. • शरीरातील नकारात्मक उर्जा बाहेर टाकली जावून शरीरात सकारात्मक उर्जा प्राप्त होते. वेदांत, पुराणात, स्वामी चरित्र, गुरूचरित्र या ग्रंथात पादुकांचे वर्णन करण्यात आलेले आहे.
  धान्य पुजनाचे फायदे • नवधान्य अभिषेकाने नवग्रह आणि २७ नक्षत्र शांती होवून त्यांची कृपादृष्टी लाभते. • कुंडलीमधील दोष नाहिसे होतात, जसे की कालसर्प शांती, मंगल दोष नाहिसे होवून अडलेली कामे मार्गी लागतात. उदा. विवाह कार्य, आर्थिक स्थिती व व्यसनमुक्ती इ. साठी होतो. 
 
 भिकाजी तुकाराम  बनसोडे (काका) यांनी श्री स्वामी समर्थ पादुका पूजनांचे महत्त्व याबाबत उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले तर बालाजी पौळ (शास्त्री)यांनी  सर्व सेवेकरांकडून विधिवत अभिषेक व पादुका पूजन शास्त्रोक्त पद्धतीने करून घेतले  
 
दिंडोरी  रथ लहुभाऊ राधोजी शेंडे  हरिभाऊ गिरमे, अरविंद रुईकर, महेश गांवड,सौ अश्निनी गांवड, सिध्दार्थ  पाटणकर, आदित्य  डूचे, ज्ञानेश्वर रोकडे, अनिल काळे, गायत्री घिगे,यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. 
या पादुका पूजन कार्यक्रमासाठी गोदावरी नदी  स्वामी समर्थ केंद्रातील विलासराव पानगव्हाणे, संदीप गवारे, राजेंद्र गायकवाड,  पत्रकार राजेंद्र सालकर यांनी भेट दिली. 
 

Leave a Reply

You cannot copy content of this page