कोपरगाव गोदावरी नदीवरील सत्तर वर्षांपूर्वीचा जुना दगडी पुल पाडण्यास सुरुवात
Demolition of seventy years old stone bridge on Godavari river at Kopargaon has started
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun28 May24 ,18.50. Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : भारतीय राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण रस्ते अंतर्गत असलेला कोपरगाव गोदावरी नदीवरील सत्तर वर्षांपूर्वीचा जुना दगडी पुल पाडण्यास सुरुवात झाली आहे, जवळपास चार मोऱ्या आतापर्यंत पाडण्यात आले आहेत. त्यासाठी यादव कंट्रक्शन यांना काम देण्यात आले असून दोन जेसीबीच्या सहाय्याने हे काम सुरू झाले आहे.
काश्मीर ते कन्याकुमारी असा देशाच्या उत्तर दक्षिणेला जोडणारा दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा नगर मनमाड महामार्ग कोपरगाव शहराच्या गोदावरी नदी पुलावरून जातो, त्याकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याने गोदावरी नदीवर मोठा पूल बांधण्याची योजना आखली होती, स्थापत्य अभियान त्याचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर 9 ऑक्टोबर 1951 साली तत्कालीन मुंबई राज्याचे बांधकाम मंत्री डॉक्टर जीवराज मेहता यांच्या हस्ते या मोठ्या पूलाच भूमिपूजन झाले होते चार वर्षे हे बांधकाम चालल होत, अशा या मोठ्या पूलाची लांबी 1040 फूट असून रुंदी 22 फूट आहे संपूर्णपणे चिरे बंदी दगडात बांधकाम असलेला हा पूल चुना व शिसे ओतून यांचा अत्यंत खुबीने वापर केलेला हा पूल बांधण्यात आला होता. 70 वर्षाच्या कालखंडात या पुलावर डांबर वाळू खडी डबर आदी थर टाकण्यात आले या थराचे अंदाजे वजन 850 टनापर्यंत होते, पाणीपुरवठ्याच्या तीन मोठ्या पाईपलाईन या मोठ्या पुलावर अस्तित्वात होत्या, त्याची वजनही सुमारे पाच टन इतके होते. अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेल्या या पुलावरून हजारो वाहने आत्तापर्यंत आली गेली. मोठा पूल म्हणून याची ओळख होती ती आता पुसली जाणार आहे.
शिर्डी इंदोर हा राज रस्ता नव्याने होत आहे त्यात सावळी विहीर ते कोपरगाव पहिला टप्पा सुरू झाला असून या कामात हा गोदावरी वरील जुना पूल येत होता तो पाडून त्या जागी नवापूल प्रस्तावित आहे. त्या शेजारी नव्याने पु ल बांधण्यात आला असून त्याचे काम लोढा कंट्रक्शन नाशिक यांनी केले होते.
चौकट
सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी गोदावरी नदीवरील दोन पूल जवळजवळ बांधू नये शास्त्रीय दृष्ट्या त्यात विशिष्ट अंतर ठेवावे अशी मागणी केली होती कारण दोन पुलामधील अंतर कमी असल्यास पाण्याचा दबाव येऊन पूल वाहून जाण्याचा धोका असतो असे त्यांनी शासकीय अहवालाचा हवाला देत केले होते तेव्हा आता नवीन पूल बांधताना ज्याची काळजी सार्वजनिक बांधकाम खात्याला घ्यावी लागणार आहे.
Post Views:
233