चालकाचा ताबा सुटला, आयशर पलटी, सुदैवाने  चालक-वाहक बालबाल बचावले 

चालकाचा ताबा सुटला, आयशर पलटी, सुदैवाने  चालक-वाहक बालबाल बचावले 

The driver lost control, the Eicher overturned, luckily the driver-carrier escaped unharmed

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 7 June24 ,17.00. Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : छत्रपती संभाजी नगर ते नाशिक असा चारचाकी वाहतुक करणाऱ्या आयशर टेम्पोला झगडेफाटा चौफुलीवर अपघात झाला. चालकाचा ताबा सुटला, आयशर टेम्पो थेट उभ्या असलेल्या एसटीच्या बाजूला पलटी  झाला सुदैवाने  चालक-वाहक बालबाल बचावले 

 हा अपघात बुधवारी सकाळी दहा  वाजण्याच्या सुमारास घडला. टेम्पो पलटी झाला नसता तर थेट कोपरगाव नासिक नादुरुस्त  होऊन उभ्या असलेल्या एसटी वर जाऊन धडकला असता. केवळ दैव बलवत्तर म्हणून चालक व वाहक बचावले.
  काल संभाजीनगर येथुन नाशिककडे भरगाव वेगाने रद्दी घेऊन चाललेला एमएच २० जीसी ५५५८ क्रमांकाचा आयशर कंपनी चा  टेम्पो झगडेफाटा येथे आल्यावर टेम्पो चालकाला आपल्या गतीचा अंदाज आला नाही व समोर कोपरगाव संगमनेर नाशिक शिर्डी अशी झगडे फाटा  नावाची  चौफुली असल्याने त्याचे वेगावरील नियंत्रण सुटले व टेम्पो  उलटला सुदैवाने रोज रोडच्या बाजूने कोपरगाव शिर्डी कडे जाण्यासाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. रिक्षा स्टॅन्ड व बस स्टॅन्ड कडे नागरिक उभी असतात मात्र नेमके त्यावेळी तेथे कोणीच नसल्याने  जीवितहानी टळली.  शेजारी कोपरगाव नासिक नादुरुस्त एस टी उभी होती. एसटीच्या बाजूलाच टेम्पो पलटी झाला.  
    सदर घटनेची माहीती कोपरगाव पोलिसस्टेशनचे पोलिसनिरीक्षक वासुदेव देसले यांना पत्रकार शिवाजी जाधव यांनी भ्रमणध्वनीवरुन दिली. देसले यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस   घटनास्थळी पाठविले .चालकाने आपल्या मालकांना फोन लावत त्यांना घटनास्थळी बोलून घेतले. क्रेनच्या साह्याने उशिरापर्यंत टेम्पो उचलण्याचे काम सुरू होते.
सिन्नर ते सावळीविहीर पर्यंत रस्त्याचे काम झालेले आसुन वाहने प्रचंड वेगाने धावतात झगडेफाटा चौफुलीवर दिशादर्शक लावलेले नाही ,मार्ग सुची नाही,  साईडपट्टे नाही त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहे. त्यामुळे या परिसरात दिशादर्शक, मार्ग सूची व साईट पट्टे ओढावी अशी मागणी करण्यात आली आहे..

चौकट

नाशिक शिर्डी कोपरगाव संगमनेर या  मार्गावरील त्या जागेला झगडे फाटा  असे नाव ठेवले आहे. या   झगडे फाट्यावर नवख्या वाहन चालकाला अंदाज येत नाही. त्यामुळे या  पॉईंटवर वारंवार अपघात घडत आहेत. बांधकाम विभागाने वाहन चालकांना सावध होण्यासाठी काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे.————–

Leave a Reply

You cannot copy content of this page