दहावीच्या परीक्षेत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलची शतप्रतिशत कामगिरी; सलग ७ व्या वर्षी इंग्रजी माध्यमाचा निकाल १०० टक्के
100% performance of Dnyaneshwar English School in 10th exam; English medium result 100 percent for 7 consecutive years
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 7 June24 ,16.40. Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक मंडळाच्या संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलने दहावीच्या परीक्षेत शत प्रतिशत कामगिरी केली आहे. शाळेतील इंग्रजी माध्यमाचा निकाल यंदाही १०० टक्के लागला आहे. सलग ७ व्या वर्षे शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे,नरेश बाळासाहेब केकाण या विद्यार्थ्याने ९१.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. अशी माहिती संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक मंडळाचे व्यवस्थापकीय विश्वस्त विशाल झावरे यांनी दिली.
१३ विद्यार्थ्यांना ८५ आणि त्यापेक्षा जास्त टक्के गुण मिळाले आहेत. नरेश बाळासाहेब केकाण या विद्यार्थ्याने ९१.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर सार्थक कापडी ९०.८० टक्के, रोहन दहे ९०.२० टक्के, तनिष पैलवान ८९.१० टक्के,नकुल नरोडे ८९ टक्के, सोहम डिके ८७.६० टक्के,अतिक शेख ८६.१० टक्के या सर्व विद्यार्थ्यांना टक्के गुण मिळाले आहेत.
विद्यार्थ्यांनी खेळ, नृत्य, विज्ञान प्रदर्शन, प्रश्नमंजुषा यांसारख्या सहशालेय उपक्रमांमध्ये सहभागी होऊन हे यश संपादन केले आहे. कृतीयुक्त शिक्षण, वेळेचे योग्य नियोजन व विद्यार्थ्यांकडून पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून सराव करून घेतल्याने शाळेची गुणवत्ता उंचावली आहे व त्यामुळेच या शैक्षणिक वर्षात शाळेच्या प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थी पालक व त्यांच्या शिक्षकांचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र झावरे, सचिव किरण भोईर, विश्वस्त राजेंद्र सालकर, कैलास जाधव व व्यवस्थापकीय विश्वस्त विशाल झावरे तसेच मुख्याध्यापक सचिन मोरे यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Post Views:
178