ड्रीम प्रोजेक्ट :  पाच नंबर साठवण तलाव खोदाई पूर्ण; काँक्रिटीकरण सुरू होणार 

ड्रीम प्रोजेक्ट :  पाच नंबर साठवण तलाव खोदाई पूर्ण; काँक्रिटीकरण सुरू होणार

Dream Project : Five No. Storage Pond Excavation Completed; Concretization will begin

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 7 June24 ,17.40. Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  आ.आशुतोष काळे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ५ नंबर साठवण तलावाचे खोदाई काम पूर्णत्वाकडे जात असून रविवारी (११ मे) पासून आमदार  आशुतोष काळे यांच्या हस्ते  काँक्रिटीकरण सुरू होणार असल्याची माहिती आमदार संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे 

मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवतो मला निवडून द्या असे आवाहन केले होते  त्या आश्वासनावर विश्वास ठेवून कोपरगावच्या जनतेने आमदार आशुतोष काळे यांना संधी दिली. त्या संधीचे सोने करतांना  दोनच महिन्यातच पाच नंबर साठवण तलावाच्या कामास प्रारंभ केला. या साठवण तलावासाठी त्यांनी तब्बल १३१.२४ कोटी निधी आणून दिलेला शब्द पूर्ण केला.

                     जेव्हापासून साठवण तलावाचे काम सुरू आहे तेव्हापासून शहरातील नागरिकांना देखील आपला पाणी प्रश्न ज्या ५ नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून सुटणार आहे त्या साठवण तलावाचे सुरू असलेले काम कोपरगाव शहरातील हजारो नागरिक स्वतः जावून पाहत असून यामध्ये विशेषतः महिलांची संख्या जास्त आहे. शहरातील नागरिकांना कधी काम पूर्ण होते व नियमित पाणी कधी मिळते याची उत्सुकता लागली आहे

                      साठवण तलावाचे काम शीघ्र गतीने व्हावे यासाठी  कामाकडे आ.आशुतोष काळे हे बारीक लक्ष ठेवून आहेत.ज्या ज्या वेळी अडचणी निर्माण झाल्या त्या अडचणींवर तात्काळ मात करून शीघ्र गतीने काम सुरू ठेवून लवकरात लवकर खोदकाम पूर्ण करण्यावर भर दिल्यामुळे या साठवण तलावाचे काम लवकर पूर्णत्वाकडे जात असून पुढील कामाचा अतिशय महत्वाचा टप्पा असलेल्या काँक्रीटीकरण कामास रविवार (दि.११) पासून प्रारंभ होत आहे.  त्यामुळे लवकरच कोपरगावकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. रविवार रोजी सायंकाळी ०४.०० वाजता आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते काँक्रीटीकरण कामास शुभारंभ होत आहे.  कार्यक्रमास कोपरगाव शहरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page