कोपरगावात संजीवनी युवा प्रतिष्ठानचा ३५० वा संस्मरणीय  शिवराज्याभिषेक सोहळा

कोपरगावात संजीवनी युवा प्रतिष्ठानचा ३५० वा संस्मरणीय  शिवराज्याभिषेक सोहळा

350th memorable coronation ceremony of Sanjivani Yuva Pratishthan at Kopargaon

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 9 June24 ,18.50. Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळून निघालेला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर, फटाक्यांची जोरदार आतषबाजी, देशभरातील पवित्र नद्यांच्या पाण्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक, ३५० शिवभक्त जोडप्यांच्या हस्ते मशालींसह महाआरती, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या गगनभेदी घोषणा, शिवछत्रपतींना मानवंदना देण्यासाठी जमलेली शिवभक्तांची अलोट गर्दी अशा अभूतपूर्व जल्लोषात कोपरगाव येथे मंगळवारी (६ जून) रोजी सायंकाळी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा  ३५० वा संस्मरणीय शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.

 डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या भव्य दिव्य व सुंदर सोहळ्याचे आयोजन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. कोपरगाव शहर व तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असा भव्य दिव्य नेत्रदीपक शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सायंकाळी ५ वाजता संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक कोल्हे व त्यांच्या सुविद्य पत्नी रेणुका कोल्हे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यास विधिवत जलअभिषेक करण्यात आला. यासाठी अलकनंदा (बद्रीनाथ), धौलगंगा  (विष्णू प्रयाग), भागीरथी (उत्तराखंड), गंगा, यमुना, सरस्वती (प्रयागराज, उत्तर प्रदेश), पंचगंगा (हरिद्वार, उत्तर प्रदेश), मंदाकिनी (केदारनाथ) तसेच गोदावरी या पवित्र नद्यांचे पाणी आणण्यात आले होते. 
तद्नंतर ३५० शिवभक्त जोडप्यांच्या हस्ते मशाली प्रज्वलित करून छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करून मानवंदना देण्यात आली. यावेळी विवेक कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले. 
यावेळी  शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी  आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनास असंख्य नागरिकांनी भेट देऊन शिवकालीन शस्त्रांची पाहणी करून माहिती जाणून घेतली. 
यावेळी विवेक कोल्हे म्हणाले, रयतेचे लोककल्याणकारी राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे समतेचे पुरस्कर्ते, दूरदर्शी, न्यायप्रिय, सर्वसामान्यांना न्याय देणारे आदर्श नीतिवंत राजे होते. त्यांचे कर्तृत्व, विचार, तत्त्वज्ञान आजही सर्वांना प्रेरणा देतात. शिवराज्याभिषेक सोहळा ही भारताच्या इतिहासातील फार मोठी घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र व शिवराज्याभिषेक सोहळा आपल्या सर्वांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आहे, 
याप्रसंगी प. पू. पंडित ललित नागर महाराज म्हणाले, या  नेत्रदीपक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले याचा खूप आनंद आहे.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा, विचारधारा व धाडसी कार्यशैली आजही प्रेरणादायी आहे. त्यांचे आदर्श विचार आत्मसात करून त्याप्रमाणे मार्गक्रमण केले पाहिजे. सद्य:स्थितीत हिंदू समाजाने जागृत होण्याची गरज आहे. 
 स्नेहलता कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा शिवराज्याभिषेक सोहळा ही भारताच्या इतिहासातील क्रांतिकारक घटना आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानने आयोजित केलेला हा अद्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा कोपरगावकरांच्या कायम स्मरणात राहील.   छत्रपती शिवरायांचे जीवनचरित्र आदर्शवत असून, सर्वांनी त्यांचे विचार अंगीकारावेत, असे आवाहन त्यांनी केले.
या सोहळ्यास श्री चरित्र श्री शिवमहापुराण कथाकार प. पू. पंडित ललित नागर महाराज (सैंधवा, मध्य प्रदेश), माजी आमदार स्नेहलता  कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या सुविद्य पत्नी रेणुका कोल्हे, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, विजय आढाव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भाजपचे न.प. तील माजी गटनेते रवींद्र पाठक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, योगेश बागुल, स्वप्नील निखाडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, शिवसेनेचे (शिंदे गट) दत्ता पुंडे, महिला आघाडीप्रमुख विमल पुंडे, माजी नगरसेवक जनार्दन कदम, अशोक लकारे, जितेंद्र रणशूर, दिनेश कांबळे, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वैशाली आढाव, मोनिका संधान, माजी नगरसेविका विद्या सोनवणे, हर्षा कांबळे, दीपा गिरमे, शिल्पाताई रोहमारे, विजया देवकर, नारायणशेठ अग्रवाल, प्रदीप नवले, कैलास खैरे, जयेश बडवे, रवींद्र रोहमारे, राजेंद्र बागुल, बाळासाहेब आढाव, गोपीनाथ गायकवाड, वैभव गिरमे, संदीप देवकर, दीपक जपे, बापू काकडे, सुशांत खैरे, सतीश रानोडे, गोपीनाथ गायकवाड, रंजन जाधव, संतोष गंगवाल, तुषार विद्वांस, प्रसाद आढाव, विक्रांत सोनवणे, किरण सुपेकर, शंकर बिऱ्हाडे, सर्जेराव महाराज टेके पाटील, राहुल सूर्यवंशी, सचिन सावंत, ज्ञानेश्वर गोसावी, गोरख देवडे, संजय खरोडे, सिन्नू भाटिया, कुणाल लोणारी, शुभम भावसार, निखिल जोशी, गौरीश लोहारीकर यांच्यासह
भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक, शिवभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page