त्यांच्या ‘खाबुगिरी’ वृत्तीमुळे गणेश कारखाना नीट चालला नाही- बाळासाहेब थोरात

त्यांच्या ‘खाबुगिरी’ वृत्तीमुळे गणेश कारखाना नीट चालला नाही- बाळासाहेब थोरात

Due to his ‘Khabugiri’ attitude, the Ganesh factory did not run well – Balasaheb Thorat

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 11 June24 ,16.30. Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी गणेश कारखाना चालून दाखवला परंतु मोठ्या लोकांनी चालवायला घेतल्यानंतर गणेशचे  वाटोळे झाले, राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्कालीन संचालक मंडळ व शेतकऱ्यांना वेठीस धरून गणेश कारखाना कसा ताब्यात घेतला याचा मी साक्षीदार आहे.आज या गणेश कारखान्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे.त्यांच्या ‘खाबुगिरी’ वृत्तीमुळे तो नीट चालला नाही. असा घणाघाती आरोप माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी (९ जून) रोजी वाकडी येथील गणेश परिवर्तन मंडळाच्या प्रचार नारळ सभेत केला.या भागातील शेतकऱ्यांना सावरण्यासाठी मी, विवेक कोल्हे व समविचारी मंडळी एकत्र आलो असल्याचेही ते म्हणाले, अध्यक्षस्थानी  ॲड.शिवाजीराव कोते होते.

यावेळी विवेक कोल्हे म्हणाले, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी गणेश कारखाना  ३८ वर्षे असे यशस्वीपणे चालून दाखवला.  त्यांच्या  ‘गणेश पॅटर्न’ ची म्हणून राज्यभर त्यांची प्रशंसा झाली.  शेतकरी कामगार व सभासदांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागले  राहू. गणेश परिसरातील शेतकरी, कामगारांच्या हितासाठी व कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी सभासद मतदारांनी या निवडणुकीत गणेश परिवर्तन मंडळाला बहुमतांनी विजयी करून पुन्हा एकदा ‘गणेश पॅटर्न’ची प्रचिती आणून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. 
 गणेश कारखान्याला व त्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांना पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी सभासद शेतकऱ्यांनी या निवडणुकीत श्री गणेश परिवर्तन मंडळाला भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन बाळासाहेब थोरात व  विवेक कोल्हे यांनी  केले.
  प्रास्ताविक विठ्ठलराव शेळके तर सूत्रसंचालन शिवाजीराव लहारे यांनी केले.
 या निवडणुकीतून माघार घेऊन श्री गणेश परिवर्तन मंडळाला पाठिंबा देणारे उमेदवार अशोक दंडवते, बालाजी थेटे, सूर्यभान गोर्डे, गजानन फोपसे, वैशाली क्षीरसागर, दिलीप क्षीरसागर, उमाकांत धनवटे, दीपक डोके, गजाप्पा गाढवे, बाळासाहेब पाळंदे, राहुल गाढवे, बलराज धनवटे, भीमराज रकटे, चंद्रकांत डोके, साहेबराव बनकर, अण्णासाहेब वाघे, नानासाहेब शेळके, सुनील थोरात, वसंत गायकवाड, अण्णासाहेब सातव आदींचा बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
सचिन चौगुले यांनी लक्षवेधी कविता सादर केली. 
यावेळी गंगाधरनाना चौधरी,  सुधीर म्हस्के, बाबासाहेब डांगे, दादासाहेब गाढवे, एकनाथ घोगरे, अशोकराव दंडवते, रामभाऊ बोरभणे, भीमराव लहारे, चंद्रभान धनवटे, धनंजय गाडेकर, उत्तमराव घोरपडे, निर्मळ तात्या, अनिल शेळके, महेंद्र शेळके आदींसह गणेश परिवर्तन मंडळाचे सर्व उमेदवार, गणेश परिसरातील सभासद शेतकरी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page