सलोखा: कोपरगाव  येथे‎ शांतता समितीची बैठक

सलोखा: कोपरगाव  येथे‎ शांतता समितीची बैठक‎

Reconciliation: Peace Committee meeting at Kopargaon

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 9 June24 ,16.50. Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : येथील शहर पोलिस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या‎ अध्यक्षतेखाली दि.९ जुन रोजी‎ सकाळी १२.३० वाजता पार पडली‎ 

यावेळी राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर येणारे सण‎ उत्सवाच्या अनुषंगाने गावात शांतता‎ सुव्यवस्था व जातीय सलोखा‎ कायम राहावा, यासाठी गावातील‎ प्रतिष्ठित नागरिक शांतता समिती‎ सदस्य पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी पोनि रामराव ढिकले यांनी सांगितले की,‎ गावात शांतता जातीय सलोखा‎ कायम राहावा यासाठी पोलिस‎ प्रशासन आपले काम करतच आहे.‎ त्यात सोशल मिडीयावर (व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम ट्विटर) कोणत्याही जाती/धर्माच्या भावना दुखावतील असे फोटो आक्षेपार्ह  पोस्ट,माहिती प्रसारीत करु नये, त्यासाठी गावातील शांतता समिती‎ सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक‎ यांची सुद्धा पोलिस प्रशासनाला साथ‎ मिळाली तर गावात कोणत्याही‎ अनुचित प्रकार घडू शकत नाही व‎ नागरिकांशिवाय शांतता अबाधित‎ ठेवणे शक्य नाही, असे सांगितले.‎
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेटस व माहिती प्रसारीत करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल बाबत माहिती दिली आहे.
यावेळी रियाज शेख सर,  प्रमोद लबडे, असलम शेख,  भरत मोरे,  विनोद राक्षे, सुखदेव जाधव , अनिल गायकवाड  संतोष गंगवाल,विजय शिंगाडे, खलिल कुरेशी,  कलविंदरसिग दडियाल, रवींद्र पाठक,  राजेंद्र सोनवणे, विनायक गायकवाड, योगेश वाणी, प्रकाश दुशिंग, राजगुरू महाराज, मनील नरोडे ,निलेश काकडे, दीपक गायकवाड , फ्रेडी आण्णा, सनी वाघ, सफिक सय्यद, जावेद शेख, अजीज शेख, इरफान शेख, नवाज कुरेशी यांचे ६० ते ७० या सह विविध पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page