सिकन्दराबाद ते साईनगर शिर्डी रेल्वेच्या धडकेने महिला ठार
Woman killed in Secunderabad to Sainagar Shirdi train collision
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 11June24,17.10Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : रेल्वेच्या धडकेने महिला ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेआठ वाजता कोपरगाव रेल्वे लाईन वर रेल्वेस्टेशनचे पुर्वेला रेल्वेचे पोल नं. ४६०/१८ चे मध्ये संवत्सर शिवारात घडली.ताराबाई कारभारी उफाडे (६५) रा बेळगांव ता. वैजापूर जि छत्रपती संभाजीनगर असे मृताचे नाव आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी सांगितले की, कोपरगाव रेल्वे लाईनवर रेल्वेस्टेशनचे पुर्वेला रेल्वेचे पोल नं. ४६०/१८ चे मध्ये संवत्सर शिवारात शनिवारी सकाळी साडेआठ वाजता ताराबाई उफाडे हि रेल्वे गाडी क्र. १७००२ सिकन्दराबाद ते साईनगर शिर्डी जाणारे रेल्वेच्या धडकेत जागीच ठार झाली.
समीर उपस्टेशन प्रबंधक रेल्वेस्टेशन कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलिसात खबर दिली. या घटनेची पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद घेतली .
सदर महिलेच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन गावी अंत्यसंस्कार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक एस आर शेवाळे हे करीत आहेत
Post Views:
268