कोल्हे  साखर कारखान्याच्या बगॅसला अचानक आग, मोठे नुकसान पण जिवीत हानी नाही 

कोल्हे  साखर कारखान्याच्या बगॅसला अचानक आग, मोठे नुकसान पण जिवीत हानी नाही

Kolhe Sugar mill bagasse suddenly caught fire, major damage but no loss of life

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 11June24,17.20Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगांव : तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या बगॅस यार्डला शनिवारी सकाळी  (११) वाजता  अचानकपणे आग लागली. नुकसान मोठे असले तरी कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही

 संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक  प्रकाश डुंबरे, सुरक्षा अधिकारी रमेश डांगे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यांसाठी प्रयत्न केले त्यामुळे यात कुठल्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही, मात्र बगॅस यार्डचेे मोठ्या प्रमाणांत नुकसान झाले. आग विझविण्यांसाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना, कर्मवीर शंकरराव काळे कारखाना, कोपरगांव नगरपालिका, गोदावरी बायोरिफायनरी, वैजापूर नगरपालिका अग्निशामक बंबांनी व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

Leave a Reply

You cannot copy content of this page