तालुक्यातील त्या दोन गावांचे ड्रोन सर्वेक्षण

तालुक्यातील त्या दोन गावांचे ड्रोन सर्वेक्षण

Drone survey of those two villages in the taluka

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 11June24,17.00Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : ग्रामीण भागातील गावठाणांच्या सीमा निश्चित करून घेण्यासह गावातील नदी, ओढे, नाल्यांच्या सीमा तसेच रस्त्यांच्या जागा निश्चित करून देण्यासाठी  ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. मात्र असे असले तरी गेल्या दोन दिवसापासून सोनेवाडी चांदेकसारे या परिसरात  असलेल्या  जमिनीची ड्रोन कॅमेरा द्वारे मोजणी सुरू होती.नेमकी मोजणी कशासाठी यामुळे शेतकरी संभ्रमित आहे. 

कोपरगाव तालुक्यातील  शेती महामंडळाची शेकडो एकर जमीन आहे. या जमिनीचा उपयोग व्हावा म्हणून शिंदे फडणवीस सरकारने मोठमोठ्या घोषणा करून आयटी पार्क सारखे मोठे मोठे प्रोजेक्ट येथे उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे
याच परिसरात समृद्धी महामार्ग नाशिक सुरत हैदराबाद मोठे महामार्ग केले आहे त्यात पुन्हा बुलेट ट्रेन, शिर्डी नाशिक रेल्वे मार्ग होणार असल्याच्या शक्यताही वर्तवण्यात येत होत्या. त्या पद्धतीने ही काही ठिकाणी जमिनीची मोजणी झाली असल्याचे सांगण्यात येते. शेती महामंडळाच्या जमिनीत शिर्डी विमानतळ होणार होते. मात्र बागायतीजमिनी व शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असल्याने विमानतळ काकडी येथे स्थलांतरित करण्यात आले.मात्र आता सरकारने या जमिनीचा उपयोग व्हावा म्हणून या क्षेत्रात आयटी पार्क इतर प्रोजेक्ट टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने गेल्या दोन दिवसापासून ड्रोन कॅमेरे द्वारे मोजणी सुरू असल्याचे समजते. मात्र ही जमीन मोजताना शेती महामंडळाच्या जमिनी व्यतिरिक्त ड्रोन कॅमेरा का फिरला, महामंडळाच्या आसपास असलेल्या जमिनीही अधिग्रहित होणार का, यामुळे पुन्हा आता शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page