संपर्कप्रमुख बबनराव घोलप अॅक्शन मोडमध्ये; कोपरगाव शहर व तालुका ठाकरे शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर
Sankar Pramukh Babanrao Gholap in action mode; New Executive Committee of Kopargaon City and Taluka Thackeray Shiv Sena announced
उपजिल्हाप्रमुख(ग्रामीण)असलम शेख Deputy District Head (Rural) Aslam Sheikh
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 13June24,16.40Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना उपनेते विनायक राऊत, सचिव अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप यांनी तालुक्याचे ठिकाण असलेल्या कोपरगाव शहर व तालुक्याची नवी ठाकरे शिवसेना कार्यकारीणी व पदे नगर उत्तर चे जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे , तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे शहर प्रमुख सनी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आज जाहीर करण्यात आली.
पक्ष म्हणजे ८०% समाजकारण आणि २०% राजकारण करीत कार्यरत असणारा पक्ष असून सर्व पदाधिकारी याचनुसार कार्यरत राहतील, असा विश्वास संपर्क प्रमुख बबनराव घोलप यांनी व्यक्त केला नव्या कार्यकारीणीला शुभेच्छा दिल्या.
हायलाइट्स:
उपजिल्हाप्रमुख (ग्रामीण) असलम शेख, तालुका समन्वयक जाहिद युसुफ मंसूरी शहर संघटक अनिल (कालूअप्पा ) आव्हाड, शहर समन्वयक शिवनारायण परदेशी
येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लागण्याची शक्यता आहे त्यापूर्वी ही कार्यकारीणी जाहीर करून शिंदे गटाला शह देण्यासाठी हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
नवीन कार्यकारणीमध्ये निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे व पद खालीलप्रमाणे
उपजिल्हाप्रमुख (ग्रामीण) असलम शेख, उपतालुकाप्रमुख राजेंद्र बाबुराव नाजगड, रंगनाथ सोपान गव्हाणे, बाळासाहेब रखमाजी राऊत, राजमहंमद गफूर शेख, तालुका संघटक राहुल काशिनाथ होन, तालुका सह संघटक संजय काशिनाथ दंडवते
तालुका समन्वयक जाहीद युसुफ मंसूरी, तालुका सचिव अशोक सुखदेव कानडे, तालुका सहसचिव गिरीधर दिनकर पवार
तालुका विभाग प्रमुख – साहेबराव कराळे (पूर्व),शब्बीरभाई शेख (पश्चिम),विजय भानुदास ताजणे (मध्य),भाऊ पाटील पंढरीनाथ थोरात (दक्षिण) सचिन लक्ष्मण आसणे (उत्तर)
शहर समन्वयक -शिवनारायण परदेशी,
शहर संघटक अनिल (कालूअप्पा ) आव्हाड,
शहर उपसंघटक- विकी सुरेश मोरे, महेश मते,शेखर बाळासाहेब बोरावके, भूषण अरुण पाटणकर,
उपशहरप्रमुख- अमोल नानासाहेब शेलार प्रभाग क्रमांक एक व दोन बालाजी पंढरीनाथ गोर्डे (प्रभाग क्रमांक ३,४ व ५) सनी बाबुराव काळे (प्रभाग क्रमांक ६,७ व ८) आकाश कानिफनाथ कानडे (प्रभाग क्रमांक ९ व १०) संतोष जगन्नाथ जाधव (प्रभाग क्रमांक ११ व १२ गगन अनिल (पांडू) हाडा (प्रभाग क्रमांक १३ व १४),
विभाग प्रमुख – अनिकेत सताळे, दीपक सूर्यभान कराळे, किरण अशोक गायकवाड, वासिम पटेल, जाफर पठाण, आतिश अशोक बोरुडे, श्रीकांत शिवाजी बागल, महेश परदेशी यांची निवड करण्यात आली आहे