सत्कार: निळवंडे जलपूजन; माझा सत्कार स्व. शंकरराव कोल्हे साहेबांना समर्पित
Tribute: Nilavande Jalpujan; My regards Dedicated to Shankarao Kolhe Saheb
निळवंडे पाण्याने या भागातील शेती हिरवी होई पर्यंत माझा लढाI will fight until the agriculture in this area is green with blue water
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 13June24,16.50Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव मतदार संघातील अकरा गावांचा निळवंडे लाभक्षेत्रात समावेश व्हावा यासाठी त्याकाळी आग्रह धरला निळवंडे चे वाहणारे कालवे पाहता आज सोन्याचे दिवस या भागाला प्राप्त होणार आहे.या क्षणी साहेब असायला हवे होते त्यांना अतिशय आनंद झाला असता.निळवंडे जलपूजनाचा माझा सत्कार हा स्व. शंकरराव कोल्हे साहेबांना समर्पित असल्याचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी घोषित केले.
रांजणगाव देशमुख संगमनेर मार्गावरील भागवतवाडी येथे सोमवारी सायंकाळी जल पूजनाचा कार्यक्रम ६ वाजता आयोजित करण्यात आला होता त्या सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या
स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाले,निळवंडे साठी अनेक दशकांचा सुरू असलेला हा संघर्ष कोल्हे कुटुंबाला कधीच विसरता येणार नाही स्वतःवरील महत्त्वाची शस्त्रक्रिया बाजूला ठेवून बिपिन कोल्हे हे निर्मळ पिंपरी येथील निळवंडे च्या आंदोलनात भर उन्हात सामील झाले अशा भावनिक नाळ जोडलेल्या प्रश्नाला सोडवण्यासाठी मी आवश्यक तिथे संघर्ष केला व प्रश्नाचा पाठपुरावा सोडला नाही नागपूर अधिवेशनाला पायऱ्यांवर बसून स्व सरकारच्या विरोधात आंदोलन केले व निळवंडे धरणासाठी जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी भांडत राहिले कारण स्व.कोल्हे साहेब यांनी कोपरगाव मतदरसंघांतील लाभक्षेत्रातील गावांचा समावेश होण्यासाठी केलेली आंदोलने आणि पाठपुरावा हा माझी प्रेरणा ठरला.कोणत्याही श्रेय वादात न अडकता मला प्रश्न सुटल्याचे समाधान लाखमोलचे आहे.
या वेळी विक्रम पाचोरे,कैलास रहाणे, नानासाहेब गव्हाणे,धनंजय वर्पे आदी लाभार्थी शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी साईनाथ रोहमारे,विश्वास महाले, अरुणराव येवले, व्हा.चेअमन रमेशराव घोडेराव, ज्ञानेश्वर परजणे, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, सर्जेराव औताडे,बापूसाहेब बारहाते,कैलासराव रहाणे, प्रकाश गोर्डे ,नानासाहेब गव्हाणे,बाळासाहेब गोर्डे, माधुरीताई डांगे, वैशाली साळुंखे, शरदनाना थोरात,विक्रम पाचोरे,रमेश आभाळे, बापूसाहेब औताडे, त्र्यंबक वर्पे,धनंजय वर्पे,विजयराव डांगे, दत्तात्रय गुंजाळ, चंद्रभान गुंजाळ, बाबासाहेब नेहे,एकनाथ दरेकर, सुरमान सय्यद,वाल्मीक कांडेकर,रमेश रहाने,आप्पासाहेब रहाणे, दिगंबर कांडेकर, राजेंद्र कोल्हे,सुरेश पाडेकर,कानिफ गुंजाळ, ज्ञानदेव थोरात, संजय सरवार,प्रल्हाद गाडे, नवनाथ आरणे, अण्णासाहेब गांगवे, साहेबराव पाचोरे,अनिल शिंदे,नितीन पाचोरे, सुनील कांडेकर आदींसह निळवंडे लाभक्षेत्रातील गावांमधील शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित होते.
चौकट
जोपर्यंत निळवंडे चे पाणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचुन शिवारातील शेती हिरवीगार होत नाही त्या क्षणापर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील – माजी आमदार स्नेहलता कोल्हे
Post Views:
129