श्री गणेश चा विजय स्वर्गीय शंकरराव कोल्हेंच्या प्रेरणेचा विजय असून सभासदांना समर्पित – विवेक कोल्हे.

श्री गणेश चा विजय स्वर्गीय शंकरराव कोल्हेंच्या प्रेरणेचा विजय असून सभासदांना समर्पित – विवेक कोल्हे.

Shri Ganesha’s victory is the victory of late Shankarao Kolhe’s inspiration and dedicated to the members – Vivek Kolhe.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed28 June24,15.40Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगांव : श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजयासाठी सर्वांनीच कष्ट घेतले. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्याच प्रेरणेचा हा विजय असुन तो सभासदांना समर्पित असल्याचे भावना व्यक्त करून गणेशचे पालकत्व स्वीकारण्याची घोषणा जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी  यावेळी केली

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या २०२३.२४ गळीत हंगामातील मिल रोलरचे विवेक कोल्हे यांच्या हस्ते विधीवत पुजन बुधवारी कारखाना कार्यस्थळावर पार पडले त्याप्रसंगी ते बोलत होते. 
          प्रारंभी कार्यकारी संचालक  बाजीराव सुतार यांनी प्रास्तविक करतांना सांगितले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सन २०२३.२४ चा गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व नियोजन पुर्ण केले असुन त्यादृष्टीने काम सुरू आहे. साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, कार्मिक अधिकारी व्ही. एम. भिसे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
          याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक सर्वश्री. त्रंबकराव सरोदे, विश्वासराव महाले, ज्ञानेश्वर परजणे, निवृत्ती बनकर, प्रदिप नवले, निलेश देवकर, सतिष आव्हाड, ज्ञानदेव औताडे, मनेष गाडे, फकिरराव बोरनारे, बापूसाहेब बारहाते, आप्पासाहेब दवंगे, शिवाजीराव वक्ते, संजय होन, बाळासाहेब पानगव्हाणे, सोपानराव पानगव्हाणे, रमेश आभाळे, विलासराव माळी, दत्तात्रय पानगव्हाणे, एल. डी. पानगव्हाणे, कामगार नेते मनोहर शिंदे, उपाध्यक्ष गणपतराव दवंगे व कामगारांच्यावतीने गणेश कारखाना निवडणुकीतील विजयाबद्दल विवेकभैय्या कोल्हे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 
             विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, संघर्ष संकटे कोल्हे कुटूंबाला नविन नाही. गणेश कारखाना निवडणुकीत सर्वांनाच सुरूवातीला साशंकता होती पण सभासद शेतकरी आणि परिसरातील सर्वच घटकांनी निवडणुक हातात घेत त्यासाठी अहोरात्र घेतलेल्या कष्टामुळे १९ पैकी १८ जागांवर कोल्हे-थोरातांच्या गणेश परिवर्तन पॅनलला मोठे यश मिळाले., गणेश परिसरातील सभासदांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाउ देणार नाही.माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची प्रेरणा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातील सर्व संकटावर मात करून मार्गक्रमण करू असा आत्मविश्वास व्यक्त केला
शेवटी उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी आभार मानले. या कार्यक्रमास सर्व खाते प्रमुख, उपखाते प्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page