कोल्हे कारखान्याचे मयत उसतोडणी कामगारांचे वारसांना तीन लाखाचा विमा धनादेश .
Insurance check of 3 lakhs to the heirs of dead workers of Kolhe factory.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed28 June24,16.00Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे मयत उसतोडणी कामगारांचे वारसांना तीन लाख रुपयांचा विमा धनादेश संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे हस्ते बंधू विक्रम चव्हाण यांना प्रदान करण्यात आला.
. बिपीन कोल्हे या प्रसंगी बोलताना म्हणाले की, प्रत्येक मनुष्याला आपत्तीच्या काळात विम्याचे महत्व पटते. त्यासाठी प्रत्येकाने विमा घेतलाच पाहिजे.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना कार्यस्थळावर २०२१.२२ चे हंगामात चाळीसगांव (लोंझातांडा) येथील सुनिल जगत चव्हाण हे उसतोडणीसाठी आले होते, त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. याप्रकरणी अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी संबंधित यंत्रणेला कागदपत्रांची पूर्तता करण्याकामी आदेश दिले. अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग उर्फ बाळासाहेब संधान, मानद कार्यकारी संचालक बापूसाहेब औताडे व त्यांचे सहकाऱ्यांनी तसेच मयत सुनील चव्हाण याच्या कुटुंबीयांनी आवश्यक ती कागदपत्रे विमा कंपनीस दिली. कोपरगावच्या श्रीमती खंडेलवाल यांनी याकामी विशेष लक्ष देऊन मयताचे वारसांना तीन लाख रुपयांचा विमा क्लेम मंजूर करणेकामी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, ऊस व्यवस्थापक गोरखनाथ शिंदे, ऊस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, श्री. निकम आदी उपस्थित होते.