पुष्पाताई काळे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वाटप 

पुष्पाताई काळे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वाटप 

Distribution of certificate to disabled brothers by Pushpatai Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed28 June24,15.30Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव  :-गौतम   सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले,

यावेळी  पुष्पाताई काळे  म्हणाल्या की, कोपरगाव मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मतदार संघाच्या विकासाचे प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी सोडविले असून समाजातील अडचणीत असलेल्या घटकांच्या वेदनांची जाणीव ठेवून दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्वाचे असणारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी घेतलेला पुढाकार व केलेले सहकार्य अभिमानास्पद आहे. समाजाच्या अडचणींची जाणीव असणारे व वंचित घटकांसाठी काम करण्याची त्यांची प्रबळ इच्छा मतदार संघातील जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत विकासाच्या अपेक्षा पूर्ण करून विकासाबरोबरच आपली सामाजिक बांधिलकी जोपासनारे ते संवेदनशील लोकप्रतिनिधीचे असल्याचे गौरव उद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले 

यावेळी राराष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,  मंदार पहाडे, सौ. प्रतिभा शिलेदार, फकिर कुरेशी, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे,  सुनील शिलेदार, संदीप कपिले,  राजेंद्र जोशी, इम्तियाज अत्तार, राजेंद्र आभाळे, भाऊसाहेब भाबड, एकनाथ गंगूले, हर्षल जैस्वाल, विजय नागरे, यादव त्रिभुवन, रोहित चव्हाण, योगेश गंगवाल आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page