कोपरगाव फळ्या काढल्याने विठ्ठलभक्तांना आषाढीनिमित्त गोदावरी स्नानाची पर्वणी
With the removal of Kopargaon planks, Vitthal devotees enjoy bathing in Godavari on the occasion of Ashadhi
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu29 June24,19.40Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगांव : आषाढी एकादशीच्या अगोदर एक दिवस गोदावरी नदीवर बांधलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-यांच्या फळया काढल्या त्यात पावसाने हजेरी लावल्याने गोदावरी नदीला पाणी आले त्यामुळे
विठ्ठल भक्तांना आषाढीनिमित्त दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या कोपरगाव येथे गोदावरी स्नानाची पर्वणी साधता आली.
नाशिक ईगतपुरी भागात २८ जून रोजी झालेल्या पावसाची आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढील प्रमाणे तर कंसातील आकडे एकुण पाउस दर्शवितो.
दारणा ६५ (१०३), गंगापुर २२ (८५). ईगतपुरी १६४ (३८२), त्रंबकेश्वर १० (७६), नाशिक ४ (३८), नांदुर मध्यमेश्वर १२ (३३), देवगांव १३ (७३), ब्राम्हणगांव ५० (१०३), कोपरगांव २७ (७५) पढेगांव १८(१०२), सोमठाणे ०० (४०), कोळगांव १८ (४८), सोनेवाडी २९ (७२), शिर्डी ९ (४४), राहाता ५ (८३), रांजणगांव खुर्द ३ (७५), चितळी ९ (२७), तर धरण कार्यक्षेत्रात वाकी १०७ (१५४), भाम ८२ (१००), भावली १३० (३७४), वालदेवी ० (८), काश्यपी ८ (५९), गौतमी १५ (६६), कादवा ४६ (७५). आळंदी ११ (१८), पालखेड ७ (२१). याप्रमाणे पाउस झाला आहे. धरणांनी तळ गाठला आहे. दारणेत १८७५ (१२ टक्के), गंगापुर (२९ टक्के), तर मुकणे ३५ टक्के पाणी साठा आहे.
गोदावरी नदीवर कानळद पासुन नाउर पर्यंत वडगांव-कानळद, खेडलेझुंगे, हिंगणी, मंजुर, डाउच, माहेगांव देशमुख, सडे, शिंगवे, पुणतांबा आणि नाउर असे दहा कोल्हापूर पध्दतीचे बंधारे आहेत. यात साठविल्या जाणा-या पाण्याचा गोदाकाठच्या शेतक-यांना फायदा होतो. यंदा मान्सुन एक महिना उशीरा सुरू झाला त्यामुळे गोदाकाठच्या पिकांना पाण्याचा मार बसला आहे. खेडलेझुंगे आणि हिंगणी बंधा-यात मागील हंगामात साठलेले पाणी फळया टाकुन अडविले होते. चालू वर्षी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर यातील फळ्या काढल्या जातात त्यामुळे गोदावरी नदीला काही प्रमाणांत पाणी आले आहे. या पाण्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त भाविकांना गंगास्नानाची पर्वणी मिळाली आहे, परिणामी खेडलेझुंगे आश्रम, दत्त देवस्थान (माहेगांव देशमुख), शिवानंदगिरी महाराज आश्रम (मंजुर), राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम, जुनी गंगा जगदंबा मंदिर, गुरू शुक्राचार्य, कचेश्वर देवस्थान (कोपरगांव बेट), शृंगेश्वर आश्रम, चक्रधरस्वामी आश्रम (संवत्सर), रामदासीबाबा, हेमाडपंथी महादेव मंदिर, (कोकमठाण), नृसिंह देवस्थान (कान्हेगाव), चांगदेव देवस्थान (पुणतांबा), याठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. गुरूवारी पावसाने उघडीप दिली होती.