रेल्वेचे भुयारी मार्ग पाण्यात; पाणी निचऱ्याची सोय करावी; सौ. कोल्हे यांची रेल्वेमंत्र्याकडे मागणी
Railway subways in water; Water drainage should be provided; Mrs. Kolhe’s demand to Railway Minister
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu29 June24,19.30Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : रेल्वेचे भुयारी मार्गात साचणाऱ्या पाण्याच्या प्रश्नात रेल्वेमंत्री यांनी व्यक्तिशः लक्ष घालून हा प्रश्न तातडीने सोडवावा तसे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना व्हावेत अशी मागणी माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी निवेदनातून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे
मनमाड दौंड रेल्वे मार्गावरील भुयारी मार्ग बनवताना झालेल्या तांत्रिक त्रुटींमुळे बहुतांश भुयारी मार्ग पावसामुळे सध्या जलमय असून, सुमारे तीन ते चार फूट पाण्यातून प्रवाशांना जावे लागत आहे, तर वाहनांसाठी असलेले काही भुयारी मार्ग साचलेल्या पाण्यामुळे बंद पडत आहेत. पावसाची संततधार सुरू होवून अवघे चारच दिवस झाले असतानाच बहुतांश रेल्वेचे भुयारी मार्ग जलमय झाले आहेत. त्याठिकाणी सुमारे तीन ते चार फूट उंचीपर्यंतचे पाणी साचले आहे. नागरीक भुयारी मार्गात साचलेले पाणी पाहून संताप व्यक्त करीत आहेत. परंतु जाण्यासाठी अथवा येण्यासाठी भुयारी मार्गाशिवाय दुसरा पर्याय देखील नसल्यामुळे नागरिकांना पाण्यातून चाचपडत वाट शोधत दुसरे टोक गाठावे लागत आहे. पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.
भारतीय रेल्वेने देशातील सर्व मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद करण्याचा निर्णय घेतला व त्याऐवजी बहुतांश ठिकाणी रेल्वे भुयारी मार्ग सुरू केले आहेत. मात्र, चुकीच्या डिझाईन व बांधकामामुळे भुयारी मार्गात प्रतिवर्षी पावसाळ्यात ही परिस्थिती उद्भवत असते. मात्र पाच ते सहा वर्षांचा कालावधी होवून देखील त्यावर ठोस उपाय राबवण्यात प्रशासन अपयशी ठरलेले आहे. यामुळे रात्रीच्या वेळी जिवाचा धोका पत्करत दररोज अनेकांना पाण्यातून जावे लागत आहे.
यावेळी पाण्याने ठरावीक उंची गाठल्यानंतर वाहनांची रहदारी पूर्णपणे ठप्प होत आहे. सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून, या भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी शहरातून बी-बियाणे, खते, कीटकनाशके आदींची वाहतूक करणे अशक्य बनले आहे. या भुयारी मार्गाचा दररोज वापर करणारे विद्यार्थी, कामगार, लहान-मोठे व्यावसायिक व इतरांना साचलेल्या पाण्यातून वाट काढणे कठीण झाले आहे. तर पादचाऱ्यांना व दुचाकी वाहनधारक यांना पाण्यातूनच अथवा रेल्वे रूळ ओलांडून जिवाचा धोका पत्करावा लागत आहे.
कोपरगाव तालुक्यात भोजडे चौकी, संवत्सर, आंचलगाव, बोलकी आदी ठिकाणी भुयारी मार्गात देखील हीच परिस्थिती आहे.
निवेदनात म्हटले आहे.
Post Views:
96