जातीय सलोख्याचा वारसा कोल्हे कुटुंब पुढे चालवीत आहे- सौ स्नेहलता कोल्हे
The legacy of communal harmony is carried forward by the Kolhe family – Mrs. Snehalata Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu29 June24,20.00Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन समाजकारण व राजकारण केले. ते सर्व समाजाच्या सुख-दु:खात सहभागी होत असत. सामाजिक व जातीय सलोखा राखण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. तो वारसा आम्ही कोल्हे कुटुंबीय आजही पुढे चालवत आहोत, असे त्या म्हणाल्या,
आषाढी एकादशीनिमित्त येसगाव येथील मुस्लिम समाजबांधवांनी कोपरगाव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्या म्हणाल्या , हिंदू बांधवांचा आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण आज एकाच दिवशी आले आहेत. हिंदू आणि मुस्लिम बांधवांसाठी आजचा दिवस उत्साहाचा आहे. सर्वांनी एकत्र फराळ घेतला.सामाजिक सलोखा व सामाजिक ऐक्य राखण्यासाठी असे उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी येसगाव येथील गुलाब तांबोळी, सरवार शाह, मोबिन सय्यद, आरिफ तांबोळी, अल्ताफ, हसन आदी मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.
Post Views:
133