शांताबाई लोंढेच्या डोळ्याचे ऑपरेशनचा खर्च आ. काळे करणार – सौ. पुष्पाताई काळे
Shantabai Londhe’s eye surgery cost Rs. Kale will do – Mrs. Pushpatai Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu29 June24,20.10Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव :ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर यांच्या नाशिक येथे डोळ्याचे ऑपरेशन करणार असून त्यासाठी येणारा सर्व आर्थिक भार आमदार आशुतोष काळे उचलणार असल्याची माहिती गौतम बँकेच्या माजी संचालक पुष्पाताई काळे यांनी दिली
शांताबाई लोंढे सध्या शिर्डी येथील द्वारकामाई वृद्धाश्रमात आहेत. शांताबाई कोपरगावकर यांची वृद्धापकाळामुळे होत असलेली ओढाताण पाहून आ. आशुतोष काळे यांनी देखील १० हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते. ती मदत रोख स्वरुपात सौ. पुष्पाताई काळे यांनी स्वत: त्यांची भेट घेवून त्यांच्याकडे सुपूर्द केली.
त्यावेळी सौ. पुष्पाताई काळे यांनी शांताबाई कोपरगावकर यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली असता.वृद्धापकाळामुळे त्यांच्या डोळ्याची नजर कमी झाली असून डोळ्याचे ऑपरेशन करणे गरजेचे असल्याचे समजले. त्यावेळी त्यांनी आ. आशुतोष काळे शांताबाई कोपरगावकर यांच्या डोळ्याचे ऑपरेशन नासिक येथील प्रसिद्ध नेत्र तज्ञाकडून करणार असल्याचे सांगितले. तसेच द्वारकामाई सेवा ट्रस्टचे वतीने द्वारकामाई वृद्धाश्रमात सर्व वृद्धांची होत असलेली सेवा व दिल्या जाणाऱ्या सुविधा पाहून द्वारकामाई सेवा ट्रस्टचे कौतुक केले.
यावेळी द्वारकामाई सेवा ट्रस्टचे श्रीनिवास बी. सौ. सुधा बी.बाबासाहेब कोते, सुनील गंगुले, मंदार पहाडे, सुधाकर रोहोम, सौ. प्रतिभा शिलेदार, सौ. भाग्यश्री बोरुडे, विजय थोरात, बाळासाहेब रुईकर, शैलेश साबळे,डॉ.अशोक गावित्रे, अरुण खरात आदी उपस्थित होते.