कोपरगावात मंत्री राधाकृष्ण विखे येणार: वाळू तस्करांची धरपकड; महसूल विभाग ॲक्शन मोडवर 

कोपरगावात मंत्री राधाकृष्ण विखे येणार: वाळू तस्करांची धरपकड; महसूल विभाग ॲक्शन मोडवर 

Minister Radhakrishna will visit Kopargaon: arrest of sand smugglers; Revenue department on action mode पथकाची चाहूल लागताच तस्करांनी डंपर, ट्रॅक्टरमधील वाळू केली खालीAs soon as the team noticed, the smugglers brought down the sand from the dumper and tractor

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onFir30 June24,19.00Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे शुक्रवारी कोपरगाव दौऱ्यावर येत असताना येणार असल्याने  महसूल विभाग  ॲक्शन मोडवर आला असून गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास महसूल व पोलिसांच्या पथकाने वाळू तस्करांविरूद्ध धडक मोहीम राबवून सात वाहनासह   ४२ लाखाचा ऐवज जप्त करून तेरा जणांवर  दंडात्मक कारवाई केली आहे.

गुरुवारी(२९) रोजी रात्री १० वा. माहेगाव देशमुख शिवारात गोदावरी नदीपात्रात ही धडक कारवाई करण्यात आली. ४२ लाख २० हजार रुपये किमतीची वाळू व ७ वाहने जप्त करण्यात आली आहे अशी माहिती ग्रामिण पोलीस निरिक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहे.
वाळू तस्करांनी वाळु चोरीचा धडाका लावला असून गोदावरी नदीची अक्षरश: चाळणी केली आहे बेसुमार व प्रमाणापेक्षा जास्त वाळु उपशाने मोठमोठाले खड्डे पडले आहे व पर्यावरणाचा -हास होत आहे.
तालुक्यातील कुंभारी व सुरेगाव येथे पुढील आठवडयात शासनाच्या वतीने वाळु साठवणूक तसेच विक्री डेपो केंद्र पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी दिली त्या पार्श्‍वभुमीवर ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली असल्याची माहिती भोसले यांनी दिली.
पोलीसांनी केलेल्या कारवाईत करण बाळासाहेब बर्डे  (२०) रा.शहाजापूर ता. कोपरगांव, दत्तू कोळपे (पूर्ण नांव माहित नाही) फरार रा.कोळपेवाडी दिलीप विलास पवार (२५) रा.कोळगाव थडी ता.कोपरगांव, देवराम वाल्मिक कोळपे फरार रा. कोळपेवाडी,  किरण साहेबराव निकाळे (२५) रा.कोळगाव थडी, रामा कुंदलखे (पूर्ण नाव माहित नाही) रा.कोळपेवाडी कृष्णा दिपक मोरे (२०) रा.सुरेगाव, आकाश मदने (पूर्ण नाव माहित नाही) फरार रा कोळपेवाडी, अनील नाथू कचारे (२८) रा.कोळपेवाडी, मिलिंद खर्डे (पूर्ण नाव माहित नाही) फरार रा माहेगाव देशमुख, अक्षय किशोर मोरे(१९) रा.कुंभारी,गणेश डांगे (पूर्ण नाव माहित नाही) फरार रा.माहेगाव देशमुख, योगेश संजय कोळपे फरार रा.कोळपेवाडी या तेरा आरोपींविरुद्ध कारवाई करुन त्यांच्याकडून ६ लाख १० हजार रुपये किंमतीचा बाळासाहेब बर्डे यांच्या ताब्यातील स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर विना क्रमांकाचा, दोन चाकी ट्रॉली १० हजार रु किंमतीची एक ब्रास वाळू, ६ लाख १० हजार रु किंमतीचा दिलीप विलास पवार याचे ताब्यातील स्वराज कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर, हिरव्या रंगाची दोन चाकी ट्रॉली व १० हजार रुपये किंमतीची वाळू, ६ लाख रु किंमतीचा किरण बाळासाहेब निकाळे याचे ताब्यातील लाल रंगाचा राज कंपनीचा ट्रॅक्टर, एक लाल रंगाची दोन चाकी टॉली, ६ लाख रु किंमतीचा कृष्णा दिपक मोरे याचे ताब्यातील लाल रंगाचा स्वराज विना क्रमांकचा ट्रॅक्टर दोन चाकी ट्रॉली, ६ लाख रुपये किंमतीचा अनिल नातू कचारे याचे ताब्यातील निळया रंगाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर दोन चाकी ट्रॉली अर्धवट वाळूने भरलेला, ६ लाख रुपये किंमतीचा अक्षय किशोर मोरे याचे ताब्यातील लाल रंगाचा स्वराज ट्रॅक्टर, दोन चाकी ट्रॉली व ६ लाख रु किंमतीचा योगेश संजय कोळपे फरार निळया रंगाचा स्वराज ट्रॅक्टर विना क्रमांकाचा व दोन चाकी ट्रॉली  १००० रुपयाची वाळू असा एकूण ४२ लाख २० हजार रुपये किंमतीचा वाळू व वाहने ऐवज पोलीसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी सहा.फौजदार गवसणे यांनी फिर्याद दाखल केली असून  पोलीस निरिक्षक वासुदेव देसले पुढील तपास करीत आहे पुढील तपास सहा.फौजदार वांढेकर करीत आहे. या कारवाईमुळे वाळु तस्करांचे धाबे दणाणले आहे. 
तालुक्यात सद्यस्थितीत अवैध वाळू उपसा व वाहतुकीवरुन राजकारण तापलेले आहे. एरवी अवैध वाळू वाहतूक सुरु असतानाही किरकोळ कारवाई करणारा महसूल विभाग आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आला आहे.
पथकाची चाहूल लागताच गावातील  तस्करांनी वाहनांमधील वाळू खाली टाकून दिली. जप्त करण्यात आलेली वाहने प्रशासकीय इमारतीच्या समोरील मैदानावर सीसीटीव्ही निगरानीत ठेवण्यात आली आहेत. या वाहनांच्या मालकांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page