पेट्रोल पंपावर वाद, संवत्सर परिसरातील पेट्रोल पंपावरील मॅनेजरला संपवलं! दोन आरोपींना अटक एक फरार
Dispute over the petrol pump, the manager of the petrol pump in the Samvatsar area was terminated! Two accused arrested and one absconding
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onFir30 June24,19.10Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्यातील संवत्सर शिवारातील गुरूराज पंपावर तिघा मद्यपींनी पंपावरील कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली धक्काबुक्की का केली हे विचारण्यास गेलेल्या पंपाच्या मॅनेजरला हल्ला करुन भोसकून ठार मारल्याची घटना गुरुवारी (२९ जुन) सायंकाळी सात साडेसात वाजेच्या सुमारास घडली. तीन आरोपी पैकी पोलिसांनी दोन आरोपींना काही तासात अटक केली असून एका फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत
जुन्या मुंबई नागपूर महामार्गावरील संवत्सर शिवारातील गुरुराज पेट्रोल पंपावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तीन हल्लेखोरांनी पेट्रोल पंपाच्या मॅनेजर पोटावर खांद्यावर धारदार शस्त्राने भोसकून त्याचा खून केला. या हल्ल्यात दहेगाव बोलका तालुका कोपरगाव येथील रहिवासी भोजराज बापूराव घनघाव (४०) याचा मृत्यू झाला.
जुन्या मुंबई नागपूर महामार्गावर संवत्सर शिवारात गुरुराज पेट्रोल पंप आहे. या पंपावर भोजराज घनगाव हे मॅनेजर आहे. कोपरगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतील जुना मुंबई नागपूर रोड हा रात्री निर्जन असतो. यावेळी सायंकाळी सात साडेसात वाजेच्या सुमारास फिर्यादी अमोल धोंडीराम मोहीते (२५) हे गुरुराज पेट्रोलपंप येथे ड्युटीवर असतांना, तीन अनोळखी इसमांनी पल्सर मोटार सायकल क्रमांक महा. १७ सीडब्ल्यु ९१०४ वर येवुन त्यांचे पैकी दोन इसम हे मोटार सायकलवर वरुन खाली उतरले त्यांचे पैकी एकाचे अंगात चॉकलेटी व लाल पांढरे रंगाचे चेक्सचे शर्ट घातलेले होते. लाल पांढरे रंगाचे चेक्सचे शर्ट घातलेला इसम फिर्यादीकडे येवुन त्याने फिर्यादीस धक्काबुक्की करुन फिर्यादीच्या कानाखाली मारली त्यामुळे मॅनेजर भोजराज बापुराव घनघाव (मयत) हे मध्ये येवुन फिर्यादीस मारहाण करणारे अनोळखी इसमास तु माझ्या माणसाला मारहाण का केली असे विचारले असता, त्याला त्याचा राग आल्याने व ग्रे रंगाचे शर्ट घातलेला इसम व चॉकलेटी रंगाचे शर्ट घातलेला इसमांनी त्यास मारुन टाक सोडु नको असे म्हणाले तेव्हा पांढरे व लाल रंगाचे चेक्सचे शर्ट घातलेला त्या अनोळखी इसमाने त्याचे कमरे जवळुन एक धारदार चाकु काढुन, मॅनेजर भोजराज घनघाव यांची गचांडी धरुन चाकुने त्यांचे पोटात व खांद्यावर वार करुन हल्लेखोर त्यांच्याकडील मोटरसायकलवरून पळून गेले तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी साईबाबा सुपर स्पेशलिटी शिर्डी रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पेट्रोल पंपावरील कर्मचारी अमोल मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन अज्ञात हल्लेखोराविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये पुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळाला पोलीस विभागीय अधिकारी संदीप मिटके पोलीस निरीक्षक रामराव ढिकले पोसई रोहिदास ठोंबरे व पोसई
भरत दाते यांनी भेट दिली.
त्या दरम्यान संशयित दुचाकीवरुन पळाल्याची चर्चा होती. संशयित फरार झाले होते; पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत
आरोपीचे शोधकामी तयार केलेले पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपींचे फेसबुक, इंस्टा फोटो प्राप्त करून त्यांचे वास्तव्याबाबत गोपनीय माहीती प्राप्त करून आरोपीचा शोध घेऊन
काही तासातच एक आरोपी नाशिक येथून व दुसरा आरोपी शिर्डी येथून अशा दोघा संशयित आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले आहे. असून त्यांचा एक साथीदार फरार झाला असल्याचे त्यांने सांगितले आहे. ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपीस गुन्हयाचे अनुशंगाने विचारपुस केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा पेट्रोलपंपावर धक्काबुक्की करून झालेल्या वादातुन केला असल्याची कबुली दिली आहे. आरोपीना अटक करून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव दिले हे करीत आहेत. फरार झालेल्या आरोपीचा शोध घेत आहोत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर , उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप मिटके. यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. रामराव ढिकले, पोउपनि रोहीदास ठोंबरे, पोउपनि भरत दाते,पोकॉ जातीधर तमनर पोकॉ संभाजी शिंदे, पोकों गणेश मैड, पोकॉ राम खारतोडे, पोकॉ गणेश काकडे, पोकॉ मंद पण पोकॉ बाळु योंगडे, पोकॉ ज्ञानेश्वर भांगरे, पोकॉ खंडेराव रहाने, होमगार्ड गणेश नकारे, होमगार्ड अजय जाधव होमगार्ड अविनाश गायकवाड, होमगार्ड सुभान शेख यांनी केलेली आहे.
चौकट
जुना मुंबई नागपूर हा रोड रात्री निर्जन असतो. त्यामुळे रात्रीच्या सुमारास अनेक मद्यपी, हुल्लडबाजी करणारे तरुण फिरत असतात. अशावेळी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अनेकांना लुटल्याचे प्रकार समोर आले आहेत. यापूर्वी दरोडेच्या तयारीत असणाऱ्यांना तात्कालीन शहर पोलीस स्टेशनचे तात्कालीन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दोन-तीन वेळेस अटकही केलेली आहे.
Post Views:
284