समृद्धी महामार्ग:आयशर क्रुझर अपघातात  आई वडिलांसह १८ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू ! सात जखमी 

समृद्धी महामार्ग:आयशर क्रुझर अपघातात  आई वडिलांसह १८ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू ! सात जखमी 

Samriddhi Highway: An 18-month-old child died along with his parents in an Eicher Cruiser accident! Seven injured

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onFir30 June24,19.30Pm
By राजेंद्र सालकर

 कोपरगाव  : तालुक्यात समृध्दी महामार्गावर समोर चाललेल्या  आयशर टेम्पोला क्रुझर जिपने दिलेल्या  जोरदार धडकेत १८ महिन्याच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू झाला असून आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून अन्य सात जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात समृध्दी महामार्गावर रात्री सव्वा एकच्या समोर चाललेल्या  आयशर टेम्पो नं. महा.२० सीटी ६६५६  ला क्रुझर जिप नं. महा. २२ एच २५२३  ने  दिलेल्या जोरदार धडकेत क्रुझर गाडीमधील पती संतोष अशोक राठोड (वय ३०), मुलगी अवनी संतोष राठोड (वय १८ महिने), या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी वर्षा संतोष राठोड (वय २७ सर्व राहणार नेर, ता. मंठा, जि. जालना) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर  शरद शिवाजी पवार  (३६)  रा. ककडा भानु नाईक तांडा पोस्ट नेर जि. जालना, एजाज सिराज पठाण  (२४)  रा. लोणार ता. लोणार जि. जालना, बलीबाई अशोक राठोड (५०), कृष्णा अशोकराव राठोड वय (२७),कोमल कृष्णा राठोड (१९), तिन्ही रा. गोसावी पांगरी ता. मंठा जि. जालना, नितीन राम पवार (२८)  रा. मंठा जि. जालना, क्रुझर चालक  रंजीत तुकाराम राठोड (३२) रा. महोदरी ता. मंठा जि. जालना
हे सातजण जखमी झाले असून त्यांच्यावर आत्मा मालिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हे कुटुंब नेर येथून विरार मुंबईकडे जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. जालना कडुन मुंबई कडे घेवुन जात असताना क्रुझर जिप चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव वेगात समोर चाललेल्या आयशर टेम्पोला पाठीमागुन जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला आहे 
याप्रकरणी आयशर टेम्पो चालक पांडुरंग राजु पवार (२९) रा पिप्रीराजा ता.जि. संभाजीनगर यांनी कोपरगाव शहर पोलिसात फिर्याद दिली असून सदर फिर्यादीवरून क्रुझर चालक  रंजीत तुकाराम राठोड (३२) रा. महोदरी ता. मंठा जि. जालना यांच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
 शहर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखालीपो.हे.कॉ. कीशोर जाधव  हे पुढील तपास करीत आहेत

Leave a Reply

You cannot copy content of this page