समाजसेवेचा वारसा जपणारे बिपिन कोल्हे गोरगरिबांचे आधारवड;  -पराग संधान

समाजसेवेचा वारसा जपणारे बिपिन कोल्हे गोरगरिबांचे आधारवड;  -पराग संधान

Bipin Kolhe, who preserves the legacy of social service, supports the poor; -Pollination

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onFir30 June24,19.40Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या पावलावर पाऊल ठेवून समेश समाजसेवेचा अखंड वारसा जपणारे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे गोरगरिबांचे आधारवड असल्याचे गौरवउद्गार अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान यांनी बिपिन कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप प्रसंगी व्यक्त केले .

शुक्रवारी (३० जून) रोजी एम. के. आढाव विद्यालय, न. प. शाळा क्र. ३ व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांना मोफत  वह्यांचे वाटप करण्यात आले. एम. के. आढाव विद्यालय  प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले,  राजेंद्र सोनवणे, रवींद्र पाठक, गोपीनाथ गायकवाड,  नसीर सय्यद,  राजेंद्र बागुल,  अमित पराई,  सचिन सावंत, चंद्रकांत वाघमारे, संतोष साबळे, भाजप किसन मोर्चाचे शहराध्यक्ष सतीश रानोडे, खालिक कुरेशी, एम.  प्रभारी मुख्याध्यापक चंद्रकांत शेजवळ, शिक्षक मारुती काटे, प्रमोद लष्करे, महेश विखे, प्रसाद मुसमाडे, सतीश कर्पे, शिक्षिका अर्चना बोराडे, अलका भोसले, स्नेहल वाघचौरे, जयश्री जाधव, नगर परिषद शाळा क्र. ३ (मुली) च्या मुख्याध्यापिका निर्मला निकम, शिक्षिका रजनी गायकवाड, अनुराधा सोमासे, सरस्वती कानडे, विमल वाणी, गीतांजली चौधरी, प्रताप वळवी, कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकुमार खाडे, उपशिक्षिका यु. एम. घुले, एम. एस. शिंदे, के. एस. वलटे, आर. बी. बडे, एम. डी. कुमावत, ए. एस. घुगे, एस. ए. पंडोरे, एम. एस. पावले, खिल्लारी, शिक्षकेतर कर्मचारी अनिल वायखिंडे, गयाबाई नरोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पराग संधान म्हणाले,  संजीवनी उद्योग समूह कोपरगाव शहर व तालुक्यातील अडीअडचणीच्या व नैसर्गिक आपत्तीच्या काळात नेहमीच जनतेच्या मदतीला धावून जात स्व. शंकरराव कोल्हे यांचा जनसेवेचा वारसा सर्व जाती-जमातीतील लोकांना बरोबर घेऊन बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे,  विवेक कोल्हे समर्थपणे पुढे चालवत आहेत. 
बिपीन कोल्हे यांनी गेल्या ३०-३५ वर्षांपासून ते आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करताना  हार, तुरे, शाल, सत्कार न स्वीकारता शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करून त्यांच्या शिक्षणासाठी मदत करून  त्यांनी आपल्या कार्यातून समाजासमोर आदर्श उभा केला आहे.

चौकट

पर्यावरणाच्या दृष्टीतून बिपिन कोल्हे यांनी सातत्याने वृक्षरोपणाला प्राधान्य दिले आहे त्यातूनच वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यात एक लाखावर झाडे लावली आहेत. वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनावर भर देऊन पर्यावरण संतुलनाचे मोठे काम ते करत आहेत, 

डी. आर. काले व राजेंद्र सोनवणे यांनी कोल्हे कुटुंबीय समाजसेवेत अग्रेसर असल्याचे सांगून त्यांच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली.  सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रताप वळवी व अर्चना बोराडे यांनी केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page