कोपरगाव रोटरी क्लब;अध्यक्ष राकेश काले आणि सचिव विशाल आढाव
Kopargaon Rotary Club; President Rakesh Kale and Secretary Vishal Adhaav
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onFir30 June24,19.50Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव: सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल चे २०२३-२४ च्या अध्यक्षपदी राकेश काले आणि सेक्रेटरीपदी विशाल आढाव यांची निवड सहाय्यक प्रांतपाल दीपक मनियार यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर करण्यात आली आहे.
सदरील कार्यक्रमात रोटरी क्लबच्या नूतन कार्यकारणीत खजिनदार अमर नरोडे, क्लब ट्रेनर डॉ. विनोद मालकर, पब्लिक इमेज डायरेक्टर प्रकाश जाधव, टी आर एफ डायरेक्टर कुणाल आभाळे, मेंबरशिप डायरेक्टर सनी आव्हाड यांचा समावेश आहे.
नूतन कार्यकारणी सदस्यांना मावळते अध्यक्ष वीरेश अग्रवाल यांनी शुभेच्छा देत कार्यकारणी जाहीर केली.
नूतन अध्यक्ष राकेश काले यांनी यावर्षी परिवर्तन, शिक्षण, आरोग्य, निसर्ग, महिला आणि युवा वर्गांसाठी विविध प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
रोटरीचे सदस्य , मार्गदर्शक आणि संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे आणि विश्वस्त सुमित कोल्हे यांच्यासह विविध मान्यवरांनी नूतन अध्यक्ष, सेक्रेटरी आणि कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रसंगी मागील प्रेसिडेंट रोहित वाघ, डॉ. रावसाहेब शेंडगे, रिंकेश नरोडे, हर्षल दोषी , विक्रम लोढा, विशाल मुंदडा, अनुप डागा, अनुप पटेल, नवनाथ सोमासे, डॉ. महेंद्र गवळी, सुमित पवार आणि इतर रोटरी सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेसर इमरान सय्यद तर आभार प्रदर्शन सुमित कोल्हे यांनी केले.