समृध्दी महामार्गावर कारचा भीषण अपघात; आई वडील व मुलगा तीन जण जागीच ठार,
Fatal car accident on Samrudhi Highway; Mother, father and son were killed on the spot.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSun2 June24,14.30Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर रविवारी भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हुंडाईच्या वारणा कार रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार धडकल्याने झालेल्या अपघातामध्ये आई-वडील आणि मुलगा अशा तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहेत.
मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर
हुंडाईच्या वारणा कार क्र. महा. ०४ जेव्ही. २४३० हिने रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ हा अपघात झाला. मोहम्मद जावेद अख्तर (५८) (वडील) शमीम बेगम मोहम्मद अख्तर (५१) ( आई) व अक्रमुद्दिन मोहम्मद जावेद (२२) अशी मृतांची नावे आहेत. तीनही मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाच्या परिसरात रविवारी (२जुलै) रोजी सकाळी साडेअकराच्या दरम्यान हा अपघात झाला. कारमध्ये तीन जण प्रवास करत होते. नांदेडहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने कार जात असताना धोत्रे गावाच्या परिसरात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व अनियंत्रित झालेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावर जाऊन धडकली . मुलगा आक्रमक दिन जावेद अख्तर हा गाडी चालवत होता असे कळते.
या अपघातामध्ये गाडीचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, बुलढाणा बस अपघाताची घटना ताजी असताना आज पुन्हा समृद्धी महामार्गावर अपघात घडल्याने रस्ते अपघात आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Post Views:
326