मला अर्धी वाटी पोषण आहार चाखण्याची परवानगी दया – संजय काळे
Allow me to taste half a bowl of nutrition – Sanjay Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed5 June24,18.00Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील अर्धी वाटी पोषण आहार चाखण्याची मला परवानगी मिळावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे संजय काळे यांच्या पत्रामुळे पंचायत समितीच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे
महाराष्ट्र राज्य शासनाने प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये मोफत पोषण आहार योजना चालू केलेली आहे. कोपरगाव तालुक्यातील विद्यार्थी सेवन करीत असलेला पोषण आहार निश्चितच उच्च दर्जाचा असणार. त्यामुळे असा पोषण आहार चाखण्याचा सदर उपक्रम मी सोमवारी (१० जुलै) पासून चालू करणार असून, मी कुठल्याही शाळेला पूर्वकल्पना न देता पोषण आहाराची चव घेणार आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक शाळेत किती वाजता पोषण आहार शिजतो व विद्यार्थ्यांना किती वाजता दिला जातो याची शाळा निहाय उपलब्ध असलेली दस्तातील माहिती मला तात्काळ ईमेल वर पाठवावी.मी निश्चय केलेला आहे कि रोज एखादया शाळेत जाऊन ते विद्यार्थी जो पोषण आहार सेवन करतात त्याची मी चव घेणार. त्यासाठी मला अर्धी वाटी पोषण आहार चाखण्याची परवानगी मिळावी. असे संजय काळे यांनी पत्रात म्हटले आहे
पोषण आहाराबाबत नियमावली जाहीर केली आहे. मुख्य म्हणजे, शाळेत पोषण आहार आल्यानंतर अन्न पुरवठा करणाऱ्या व्यक्तीस प्रथम या आहाराची चव खाण्यास द्यावे व त्यानंतर अर्ध्या तासाने विद्यार्थ्यांना या अन्नाचे वाटप करण्याची सूचना करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यापूर्वी त्या पदार्थाचा नमुना बाजूला काढून ठेवण्याची सूचनाही करण्यात आली आहे. कच्चे, बेचव अन्न, कमी स्निग्धांश, अन्नाला आंबूस वास, भेसळे असलेले अन्न विद्यार्थ्यांना वितरीत करू नयेत. आहाराचा नमुना महिन्यातून कमीत कमी एकदा किंवा आवश्यकेतनुसार जास्त वेळेस प्रयोग शाळेत पाठवावा, ज्या संस्थेकडून अन्न शिजविले जात आहेत, त्या संस्थेच्या स्वयंपाकगृहात भेट देऊन स्वयंपाकगृह आरोग्यदायी आहे की नाही, याची खात्री करावी, अशी सूचना केली आहे.सूचनांचे कितपत पालन केले जाते, हे पाहणे आता उत्सुकतेचे आहे. तो संजय काळे यांनी या प्रश्नात हात घातला म्हणजे सर्वच नियमांचे पालन होणे पर्यंत असल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे तर संजय काळे यांच्या या उपक्रमाचे पालक वर्ग व नागरिक यांच्याकडून स्वागत करण्यात येत आहे
कोट
शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारासंदर्भात आलेल्या तक्रारींची योग्य दखल घेताना, या आहाराचा दर्जा तपासण्यासाठी शाळेच्याच स्तरावर एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीने आठवड्यातून एक दिवस शालेय पोषण आहाराचा दर्जा तपासावा, दररोज येणाऱ्या आहाराचा काही भाग काढून ठेवला जातो त्यातून पालक अथवा कोणीही त्याची चव चाखू शकतो संजय काळे यांचा ईमेल अजून प्राप्त झालेला नाही त्यावर विचार करू- सचिन सूर्यवंशी, गटविकासाधिकारी,कोपरगाव पंचायत समिती,
Post Views:
340