बिपिन कोल्हेंचे सामाजिक कार्य कौतुकास्पद कैलासशेठ ठोळे
Bipin Kolhe’s social work appreciated by Kailassheth Thole
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat8 June24,16.10Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचेगौरवोद्गार कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्योजक कैलासशेठ ठोळे यांनी शनिवारी (८ जुलै) रोजी श्रीमान गोकुळचंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना केले.
यावेळी अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, स्कूलचे सचिव दिलीपशेठ अजमेरे, सहसचिव सचिनशेठ अजमेरे, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, सदस्य राजेश ठोळे, संदीप अजमेरे, डॉ. अमोल अजमेरे, भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, राजेंद्र सोनवणे, स्वप्नील निखाडे, ‘अमृत संजीवनी’ चे संचालक गोपीनाथ गायकवाड, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, नसीर सय्यद, जितेंद्र रणशूर, संजीवनी पतसंस्थेचे संचालक राजेंद्र बागुल, भाजप किसान मोर्चाचे शहराध्यक्ष सतीश रानोडे, अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष खालिक कुरेशी, रोहण दरपेल, शक्ती परदेशी, मंगेश सोनवणे, अल्तमश शेख, श्री. गो. विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर, उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड, पर्यवेक्षिका उमा रायते, शिक्षक दिलीप तुपसैंदर, सुरेश गोरे, अनिल अमृतकर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कैलासशेठ ठोळे पुढे म्हणाले, स्व. शंकरराव कोल्हे व त्यांची सुकन्या नीलिमा कोल्हे-पवार हे दोघेही श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे माजी विद्यार्थी. स्व. शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर नि:स्वार्थी भावनेने कष्टकरी शेतकरी, कामगार व समाजातील तळागाळातील लोकांच्या उत्कर्षासाठी काम करून कोपरगाव तालुक्यात शिक्षणाची व विकासाची गंगा आणली. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, सहकार, उद्योग, सिंचन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावून त्यांनी कोपरगावचे नाव राज्य व देश पातळीवर नेले. गौरवाची बाब आहे. कोपरगावच्या विकासात कोल्हे कुटुंबीयांचे मोठे योगदान असून, ते कधीही विसरता येणार नाही, असेही ठोळे म्हणाले.
दिलीपशेठ अजमेरे यांनी श्रीमान गोकुळचंद विद्यालयाबाबत कोल्हे कुटुंबाच्या योगदानाचा ऊहापोह केला.
यावेळी बिपिन कोल्हे यांच्या वाढदिवसाला दरवर्षी दोन ते अडीच लाख वह्यांचे मोफत वितरण करण्यात येते. यंदाही त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वह्या वाटप, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबीर आदी सामाजिक उपक्रम संपूर्ण कोपरगाव मतदारसंघात राबविण्यात आले. असल्याची माहिती पराग संधान यांनी दिली
डी. आर. काले यांनी कोल्हे कुटुंबीय व संजीवनी उद्योग समुहाकडून जनसेवेचा हा महायज्ञ अखंडपणे सुरू असल्याचे सांगितले. आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत सुंदर कविता सादर केल्या.
प्रारंभी मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक सुरेश गोरे यांनी केले.