ठाकरे शिवसेनेच्या महिला पदाधिकारी  फोडणाऱ्या त्या पक्षाची अवस्था दयनीय- ॲड.शुभांगी पाटील

ठाकरे शिवसेनेच्या महिला पदाधिकारी  फोडणाऱ्या त्या पक्षाची अवस्था दयनीय- ॲड.शुभांगी पाटील

Thackeray Shiv Sena’s female office bearers, the condition of that party is miserable – Adv. Shubhangi Patil

स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढू ! Local self-government bodies will fight on their own ! 

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSun9 June24,19.10Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : भाजपने यापूर्वी आमदार फोडले आता ते  महिला पदाधिकारी फोडत आहेत. यावरून त्या पक्षाची दयनीय स्थिती लक्षात येते, अशी घणाघाती टीका ठाकरे शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्राच्या महीला संपर्कप्रमुख ॲड.शुभांगी पाटील यांनी केली.लाखो सभासदांचा दावा ठोकणारा आणि संघटनात्मक कामाचा डांगोरा पिटणारा पक्ष इतर पक्षांचा महिला पदाधिकारी पळवू कसा शकतो ? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. कोपरगाव येथे महिला मार्गदर्शन मेळाव्यात त्या बोलत होत्या

ठाकरे शिवसेना  महिला आघाडी यांच्या वतीने शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख माजी मंत्री बबन घोलप यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्राच्या महीला संपर्कप्रमुख ॲड.शुभांगी पाटील आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या महीला संपर्कप्रमुख शुभदा  शिंदे तसेच उत्तर नगर जिल्हा संघटीका सपना मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगाव हॉटेल विरा पॅलेस मध्ये शनिवारी (८जुलै)  रोजी सायंकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान आयोजित करण्यात आलेला महिला मार्गदर्शन मेळावा  मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या मेळाव्यात श्रीरामपुर नेवासा कोपरगाव महिला पदाधिकाऱ्यांची निवड  करण्यात आली. 
या मेळाव्यामध्ये परिसरातील शेकडो महिला सहभागी झाल्याने  भगवा जल्लोष निर्माण झाला.
ॲड. शुभांगी पाटील पुढे म्हणाल्या ठाकरे कुटुंबियाशी निष्ठा ठेवून उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करायचे आहे त्यासाठी अंतर्गत  वाद बाजूला ठेव जोमाने कामाला लागा, उत्तर महाराष्ट्रात जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी विडा उचलला आहे त्यासाठी मला तुमची साथ पाहिजे. आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती व इतर सर्व निवडणुका पूर्ण ताकतीने लढा व गद्दाराना कायमचे घरी बसवा, महीलांना कसलीही गरज पडो अथवा संकट येवो संपर्क करा मी मदतीला धावून येईल असे आश्वासन दिले, यावेळी त्यांनी  प्रचारासाठी विरोधकांचे कमजोर मुद्दे दिलेत, यावेळी  त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
 शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या महीला संपर्कप्रमुख शुभदा शिंदे  यांनी भाजप सरकारवर टीका करतांना सरकार विविध प्रश्नांवर लोकांची फसवणूक करत असून इतर पक्षांचे आमदारांना वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॅकमेलिंग करून पळवून नेत आहे.
पण जनता आपल्या पाठीमागे असून
स्वराज्य संस्था स्वबळावरलढविण्याचा नारा देत उध्दवसाहेबांची आपण काळजी करू नका फक्त निष्ठेने बहीणी म्हणून खरी साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक करताना  उत्तर नगर जिल्हा संघटीका सपना मोरे म्हणाल्या ज्यांची लायकी नसताना त्यांना शिवसेनेने मोठे केलं ज्यांनी गद्दारी केली ते उद्धव ठाकरेंच्या पायाची धूळ सुद्धा नाहीत जाऊद्या गद्दार गेले ते गेले त्यामुळे निष्ठावांतांना आणि कर्तुत्वान महिलांना जनसेवा करण्याची मोठी संधी  मिळेल यात शंका नाही.निलम गोऱ्हे,मनिषा कायंदे यांचे नाव न घेता त्यांचे जाणे  म्हणजे सुंठे वाचून खोकला गेला असेच म्हणावे लागेल असेही त्या म्हणाल्या,
यावेळी ठाकरे शिवसेना उत्तरनगर जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, उपजिल्हाप्रमुख अस्लम शेख, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, तालुका समन्वयक मुन्ना मन्सुरी, शहरप्रमुख सनी वाघ, माजी शहरप्रमुख भरत मोरे,. संपर्क प्रमुख मनोज कपोते, प्रविण शिंदे,. शेतकरी संघटनेचे उल्हास पवार,. उपशहरप्रमुख आकाश कानडे,. पप्पू इंगळे, निलेश वाणी, सोमनाथ भोसले, संदिप आयोनर,. शेकडो महीला व पुरुष शिवसैनिक हजर होते.
कोपरगाव महिला आघाडी शहर प्रमुख राखी विसपुते यांनी आभार मानले….

Leave a Reply

You cannot copy content of this page