कोपरगाव: शहीद हवालदार दीपक आहेर यांच्यावर कोळपेवाडी येथे  लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

कोपरगाव: शहीद हवालदार दीपक आहेर यांच्यावर कोळपेवाडी येथे  लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

Kopargaon: Martyr Havaldar Deepak Aher cremated with military honors at Kolpewadi.

 
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onMon10June24,15.10Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील रहिवासी असलेले भारतीय सैन्यदलातील २५३ मेडिअम रेजिमेंटचे हवालदार दिपक कृष्णा आहेर (४१) यांचे ९ जुलै रोजी पहाटे ४:१५ मी. कमांड हाॅस्पिटल, पुणे येथे निधन झाले.त्यांच्यावर कोळपेवाडी वैकुंठभुमीमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद दिपक यांना अखेरचा निरोप देण्यासाठी एक  हजाराहून अधिक लोकांचा जनसागर लोटला होता.

यावेळी कोळपेवाडी व सुरेगाव ग्रामस्थ दुकाने बंद ठेवून अंत्यसंस्कारा मध्ये सहभागी झाले.यामध्ये तरुण वर्ग आणि महिलांची संख्या लक्षणीय होती.  महाराष्ट्र पोलीस दल व लष्करी जवानाच्या तुकडीने बंदुकीतून तीन फैरी झाडून बिगुल वाजवत हवालदार दिपक आहेर यांना मानवंदना देताच जमलेला जनसागर भावुक झाला.
 ” दिपक आहेर अमर रहे”,अमर रहे, ‘वंदे मातरम’,”भारत माता की जय” 
 या घोषणांनी अवघा परिसर दुमदुमून सोडला.
 
दिपक हे २००० मध्ये लष्करात जवान म्हणून भरती झाले होते. गेली २३ वर्ष ते सेवेत कार्यरत असून  निवृत्तीस काही दिवस शिल्लक असतांना वयाच्या ४१ व्या वर्षी कमांड हाॅस्पिटल, पुणे येथे उपचारा दरम्यान निधन झाले.  रविवारी त्यांच्या  निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या कुटुंबीयांवर व कोळपेवाडी गावावर शोककळा पसरली. 
 पुणे येथून कोळपेवाडी शिवेवर पार्थिव दाखल झाल्या नंतर माजी सैनिक दलाच्या वतीने खांदा देवुन दिपक यांचे पार्थिव लष्कराच्या फूलांनी सजवलेल्या ट्रक मध्ये ठेवण्यात आले ट्रक पुढे ऐ मेरे वतन कें लोगो…”हे गीत लाऊडस्पीकरवर वाजत होते रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी  दिपक यांना मानवंदना देत अंतिम दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती बाजार तळावर उभारलेल्या मंडपात दिपक यांचे पार्थिव नागरिकांना अंत्य दर्शनासाठी ठेवले होते माजी आमदार अशोक काळे भारतीय सैन्यदलाच्या वतीने नायब सुभेदार शामसुंदर जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोपरगांवचे तहसिलदार संदिपकुमार भोसले, जिल्हा माजी सैनिक कल्याण बोर्डा च्या वतीने सुभेदार धन्यकुमार सरवदे, सुभेदार यमाजी चेहडे,कोपरगांव तालुका पोलिस स्टेशनच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक महेश कुसारे, कोपरगांव तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने अध्यक्ष युवराज गांगवे,सुभेदार मारुती कोपरे स्वच्छतादूत सुशांत घोडके संरपच सुर्यभान कोळपे शंशिकांत वाबळे निव्रुत्ती कोळपे आदिनी पुष्पचक्र अर्पण केले यावेळी अनेक मान्य वरांनी श्रध्दाजंली अर्पन केली हवालदार दिपक यांचे पार्थिवावर ठेवण्यात आलेला राष्ट्रध्वज तिरंगा ध्वज पत्नी कांचन यांचेकडे सुपुर्द करण्यात आला मुलगा साहिल याने हवालदार दिपक यांचे पार्थिवाला अग्नी दिला सुत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण सर यांनी केले..

Leave a Reply

You cannot copy content of this page