चांद्रयान-३’ मोहीम फत्ते; तो क्षण भारतासाठी  ऐतिहासिक व अभिमानास्पद -स्नेहलता कोल्हे  

चांद्रयान-३’ मोहीम फत्ते; तो क्षण भारतासाठी  ऐतिहासिक व अभिमानास्पद -स्नेहलता कोल्हे  

Chandrayaan-3′ mission statement; That moment is historic and proud for India – Snehlata Kolha

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 23Aug24,19.10Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :चांद्रयान-३’ मोहीम फत्ते; तो क्षण भारतासाठी  ऐतिहासिक व अभिमानास्पद असल्याचे भावना माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केल्या.कोपरगावात संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने बुधवारी संध्याकाळी ६.०४मिनिटांनी  ‘चांद्रयान-३’ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करून अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात गरुडझेप घेतली असून, जगात नवा इतिहास रचला आहे. आजचा दिवस संपूर्ण भारतासाठी ऐतिहासिक, गौरवास्पद व अभिमानास्पद व अविस्मरणीय दिवस आहे. भारताच्या अवकाशातील या कामगिरीची जगाच्या इतिहासात गौरवाने नोंद होईल, अशा शब्दांत  स्नेहलता कोल्हे यांनी आनंद व्यक्त केला आहे. कठोर मेहनत घेऊन ही आव्हानात्मक कामगिरी यशस्वी केल्याबद्दल ‘इस्रो’च्या सर्व वैज्ञानिकांचे  अभिनंदन करून त्यांना धन्यवाद दिले आहेत.

संजीवनी युवा प्रतिष्ठानने  अध्यक्ष  विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर संध्याकाळी ‘ युवा सेवक, भाजप, भाजयुमो, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी व नागरिकांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन ‘भारतमाता की जय,’ ‘वंदे मातरम्’ च्या घोषणा देत पेढे वाटून, फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
चौकट
 चांद्रयान-३ ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी मी शिर्डीच्या श्री साईबाबांचे दर्शन घेऊन विशेष प्रार्थना केली होती. अखेर आज ‘चांद्रयान-३’ चे चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग झाल्यामुळे मला अत्यानंद झाला आहे. ‘चांद्रयान-३’ मोहिमेत अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र व ‘इस्रो’मध्ये कार्यरत वैज्ञानिक मयुरेश शेटे यांचा सक्रिय सहभाग असून, महाराष्ट्रातील राजुरी येथील आसिफ महालदार यांच्या कंपनीकडे या मोहिमेच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.- स्नेहलता कोल्हे 
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष दत्ता  काले,  रवींद्र पाठक,  स्वप्नील निखाडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, नारायणशेठ अग्रवाल, वैभव आढाव,  गोपीनाथ गायकवाड, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष खालिक कुरेशी, फकिर मोहम्मद शेख पहिलवान, वैभव गिरमे, दीपक जपे, भाजप किसान मोर्चाचे शहराध्यक्ष सतीश रानोडे, नरेंद्र लकारे, जगदीश मोरे, संतोष नेरे, शंकर बिऱ्हाडे, शफिक शेख, इलियास खाटिक, एस. पी. पठाण, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, वासुदेव शिंदे, गौरव आढाव, भैय्या नगरे, वैभव सोळसे आदींसह भाजप, भाजयुमो, शिवसेना व रिपाइंचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page