कांदा निर्यात शूल्काचा फेरविचार होणे गरजेचे – आ.आशुतोष काळे
Onion export duty should be reconsidered – A. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 23Aug24,19.20Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : पाऊस नाही खरीप हंगाम धोक्यात अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे अशा शेतकऱ्यांना कांदा विक्रीतून काहीसा दिलासा मिळाला असता. परंतु केद सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार होणे गरजेचे असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे. अध्यक्षस्थानी प्रियदर्शनी महिला मंडळाचे अध्यक्ष पुष्पाताई काळे होत्या
केंद्र सरकारने कांदा खाणाऱ्यांचा विचार करून ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. कांदा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचा देखील विचार केंद्र सरकारने करून ४० टक्के शुल्क निर्णयाचा फेरविचार करावा. यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु असुन त्याबाबत केंद्र सरकार निश्चित फेरविचार करेल. असेही आमदार आशुतोष काळे म्हणाले
माजी आमदार अशोक काळे व आ. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरसगाव येथील मोफत सर्व रोगनिदान शिबिरात बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत सर्व रोग निदान शिबिराच्या माध्यमातून विविध आजारांचे वेळीच निदान होवून पुढे उद्भवणारा धोका टाळता येतो.या शिबिराच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांकडून मेंदूचे आजार, युरो सर्जरी, हृदय विकार, जनरल सर्जरी, स्त्रियांचे आजार, हाडांचे आजार, कॅन्सर आदी आजारांची मोफत तपासणी, होते . या निमित्ताने प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या माध्यमातून हॉस्पिटलच आपल्या दारी आले असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी पुष्पाताई काळे म्हणाल्या की, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असून समाजातील गरजू महिलांची सखी म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे. परंतु संसाराचा गाडा हाकतांना महिला आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नसल्यामुळे अनेक व्याधींचा होणारा त्रास सहन करतात. त्यामुळे अशा मोफत सर्व रोग निदान शिबिराच्या माध्यमातून महिलांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून आपली काळजी घ्यावी असा मौलिक सल्ला दिला.
चौकट :- कोपरगाव मतदार संघात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आढावा घेतला असून त्यावर योग्य त्या उपाय योजना करण्यासाठी पावले उचलली आहेत. निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.- आ.आशुतोष काळे.
यावेळी कारभारी आगवण, सुधाकर रोहोम, गोवर्धन परजणे, रामदास केकाण, राजेंद्र निकोले, गोरक्षनाथ जामदार, नानासाहेब निकम, संदीप शिंदे, संजय संवत्सरकर, सौ.विमल आगवण, आप्पासाहेब निकम, अनिल महाले, अशोकराव भोकरे, सौ. मंगल उकिरडे, गोविंद पगारे, सांडू पठाण, सौ. प्रतिभा शिलेदार, सौ. मायादेवी खरे, सौ. रेखा जगताप, अशोकराव उकिरडे, कृष्णा मलिक, राहुल गायकवाड, नानासाहेब गायके, पुंडलिक चक्के, इरफान पटेल, अखिलेश भाकरे, राधु उकिरडे, प्रविण चौधरी, नितीन चौधरी, अनिल कुऱ्हे, शंकर सुंबे, पोपट भुजाडे, रामभाऊ खिलारी, अमृत शिंदे, गोपाल कुलकर्णी, सलीम पटेल, बापू भुजाडे, प्रकाश महाले, अमोल जगताप, पोपटराव जगताप, महेश पाटोळे, कैलास पाटोळे, रावसाहेब चव्हाण, सुनील भोकरे, प्रकाश मलिक, संतोष शिंदे, राजेंद्र माने, सुदाम माने, मच्छिन्द्र क्षीरसागर, अण्णासाहेब शिंदे, पोपटराव शिंदे, राजेंद्र गायके, भगवान बोजगे, किरण भागवत, सुलतान पटेल, दिगंबर निकम, रविंद्र निकम, हिरामणगुंजाळ, नवनाथ निकम, दिगंबर निकम, साईनाथ गव्हाळे, दिनकर भुजाडे, श्रीधर शिंदे, विनायक भोकरे, सुभाष साळवे, गणेश दाणे, अण्णासाहेब शिंदे, विजय कदम, पंढरीनाथ शिंदे, मनसुब निकम, बाबुराव त्रिभुवन, रामेश्वर निकम, बाबासाहेब निकम, विशाल निकम, निलेश वाघ, भाऊसाहेब पोकळे, आप्पासाहेब चक्के, संतोष शिंदे, साईनाथ चक्के, किरण जगताप, पोपट जगताप, रविंद्र पगारे, ज्ञानेश्वर शिंदे, ज्ञानेश्वर निकम, दिनेश जमधडे, किरण नवले, किरण मलिक, बाबासाहेब मलिक, रायभान रोहोम, मच्छिन्द्र निकम, सुदाम निकम, सौ.आशाबाई पोकळे, सौ. सुनीता शिंदे, सौ. ललिता चक्के, सौ. प्रियंका मलिक, सौ.उषा संवत्सरकर, सौ.प्रमिला चौधरी, सौ.शशिकला साळवे, सौ.भाग्यश्री बोरुडे, सौ.शितल वायखिंडे, कु.दिक्षा उनवणे, डॉ. सायली ठोंबरे, डॉ. स्नेहल भाकरे, डॉ. सोहेल काजी, डॉ.अनिरुद्ध उबाळे, डॉ. सिद्धेश भोईर, डॉ. महेश रक्ताटे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारभारी आगवण यांनी केले सुत्रसंचालन राहुल गायकवाड यांनी तर अप्पासाहेब निकम यांनी आभार मानले.
Post Views:
89