साखर कारखानदारी वाचवण्यासाठी इथेनॉलला प्रति लिटर ६७ रुपये भाव द्यावा – विवेक कोल्हे   

साखर कारखानदारी वाचवण्यासाठी इथेनॉलला प्रति लिटर ६७ रुपये भाव द्यावा – विवेक कोल्हे 

Ethanol should be priced at Rs 67 per liter to save sugar mills – Vivek Kolhe

हक्काच्या पाण्यासाठी तीव्र लढा उभारावाच लागेल.We have to fight fiercely for the right water

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onMon 25Sep24, 18.10Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : उसावरील एफ. आर.  पी. चा दर सरकारने  वाढविला हा निर्णय स्वागताहार्य आहे. परंतु तो देण्यासाठी आणि साखर कारखानदारी वाचविण्यासाठी साखर विक्रीचा दर ३७०० ते ३८०० रुपये करून  इथेनॉलचा दर प्रति लिटर ६७ रुपये करण्यात यावा अशी मागणी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कारखान्याच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केली.  ज्येष्ठ मार्गदर्शक संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे  यांची प्रमुख उपस्थिती होती. 

विवेक  कोल्हे म्हणाले, इथेनॉल विक्रीसाठी प्रति लिटर ६७ रुपये भाव दिला तर भारताचे कच्च्या तेलाचे लाखो करोड रुपयाचे आयात बिल कमी होण्यास मदत होईल.  परकीय चलन वाचणार आहे. आणि ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांनाही याचा फायदा होईल. परिणामतः साखर कारखानदारी वाचेल. गेल्या ७५ वर्षात तात्कालीन राज्यकर्त्यांनी घेतलेल्या धोरणामुळे सहकार चळवळ अडचणीत आली खाजगी कारखान्यांचा बोलबाला झाला गुजरात मध्ये  जागतिक अमोल कंपनीसह सर्व कारखाने सहकारी  आहेत मात्र राज्यात ७०-८० सहकारी कारखाने तग धरून आहेत. तर १०० च्या पेक्षा जास्त कारखाने खाजगी  आहेत. तात्कालीन सरकारच्या धोरणामुळे सहकारी अडचणीत आला. मोडकळीस येण्याचा धोका आणि भीती निर्माण झाली होती.  याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार मंत्रालयाची स्थापना केली पहिले केंद्रीय सहकार मंत्री म्हणून अमित शहा यांची नेमणूक केली. सहकारी  साखर कारखान्याबाबत नवे व चांगले धोरण आणले.  गेल्या ७५ वर्षात लाभले नव्हते असे स्थैर्य साखर कारखानदारीला लाभले आहे.  सहकारी सोसायटयांना आर्थिक सक्षम करण्यासाठी  १९० नवीन योजना आणल्या आहेत.गत साली केंद्र सरकारच्या धोरणामुळे उत्पादन कमी होऊनही निर्यात व इथेनॉल खरेदीमुळे व्याज वाचले आणि   तोटा भरून निघाला व कारखान्याच्या ताळेबंद राखला गेला.
विवेक कोल्हे म्हणाले की,  यावर्षी सात लाखाचे सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे  हे मोठे आव्हान असले तरी यासाठी टनेज वाढवण्याची गरज आहे  त्यासाठी शेतकी विभागाचे सहकार्य घ्या उसे राजकीय पीक व शाश्वत पीक म्हणून गणले जाते सभासदांनी अतिरिक्त उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोल्हे कारखान्याने  सांडपाण्यापासून सीबीजे  सीएनजी,पोटॅश खत, वीज निर्मिती यासह विविध उत्पादने सुरू केली आहेत. 1972 नंतर पुन्हा एकदा तसा दुष्काळ येणार असल्याची चर्चा सुरू आहे पण मोबाईल मध्ये व्यस्त असलेल्या  युवकांना याचे गांभीर्य नाही  फुले कारखान्याने मोफत चारा बियाणे 100% अनुदानावर देऊन हातभार लावण्याचे धोरण घेतले आहे पाण्याशिवाय शेतकरी आणि शेतकऱ्याशिवाय कारखानदारी टिकणार नाही.पाणी प्रश्नी लक्ष वेधू इच्छितो. आपल्या तालुक्याचे पाणी कसे गेले याचा संपूर्ण पाढा वाचताना स्व. शंकरराव कोल्हे यांनी दूरदृष्टीने पाण्यासाठी केलेल्या लढ्याची इत्यंभूत माहिती दिली २००० सालीच त्यांनी पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्याची मंजुरी घेतली होती २००३ ला एक्सप्रेस कॅनॉल झाला आणि पाणी कमी पडू लागले त्यावेळेस  खडा आंदोलन केले प्रसंगी स्व पक्षाची स्व:पक्षाविरुद्ध  मोर्चे  उपोषणे आंदोलन केले. शेवटी त्यांनी पाण्यासाठी पक्षत्याग केला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सौ. स्नेहलता कोल्हे यांनी निळवंडे  कालव्यांचे  काम होण्यासाठी निधी मिळावा. म्हणून विधानसभेच्या पायऱ्यावर बसून आंदोलन केले. सन  २०१८-१९ ला १८०० कोटी निधी मंजूर करून घेतला. लोकप्रतिनिधी बदलले गेले आणि ते १८०० कोटी  बारगळले. आलेल्या लोकप्रतिनिधीकडून चार वर्षात ३२९२ कोटीसाठी कुठलेच पाऊल उचलले गेले नाही.
 २००५  साली कोणामुळे मेंढेगिरी चे भूत मानगुटी बसले. त्यावेळी दोन अन्यायकारक निर्णय झाले ओव्हरफ्लो चे पाणी बंद झाले दाद मिळाली नाही. आम्ही न्यायालयीन लढाई केली. परंतु दुर्दैवाने यश आले नाही.  अधिवेशन नसताना  समन्यायी कायदा रद्द झाल्याच्या कसे  सांगू शकता ? अशी मिस्कील टीका विवेक कोल्हे यांनी लोकप्रतिनिधी वर  केली.

चौकट

३००० कोटी आल्याचे  सांगता  मतदार संघात ८० खेडे आणि तिकडचे २० असे शंभर जरी धरले तरी प्रत्येकाच्या वाट्याला ३० कोटी आले  असते तर प्रत्येक गाव खेडे चकाचक झाले असते मग ते ३० कोटी  आले का ?  असे विचारता लोक म्हणाले  ३० कोटी आले नाहीत,  परंतु  ते आल्याचा गाजावाजा करणारे फ्लेक्स बोर्ड मात्र  गावात लागल्याचे सांगितले. मग कुठे गेला हा निधी ? फक्त थापा मारायच्या,  वेड्यात काढायचे,  आता वेळ  मारून नेता येईल,  पण पुढची पिढी माफ करणार नाही. असा इशारा देताना निधी येण्याचा हाच ओघ राहिला तर कार्यकाल संपेपर्यंत दहा हजार कोटी रुपये मतदार संघासाठी निश्चित येतील अशी मुश्किल टीका विवेक कोल्हे यांनी केली. 

विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, रडल्याशिवाय आई बाळालाही दूध पाजत नाही. आपल्याला हक्काच्या पाण्यासाठी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रेरणेतून बिपिन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर, नाशिक, मराठवाडा असा एकत्रित लढा उभारावाच लागेल. अभ्यासपूर्ण  मांडणी आणि  जनजागृती नसल्यामुळे प्रश्न भेडावत आहे. तेंव्हा  येत्या २ ऑक्टोबर गांधी जयंतीच्या   प्रत्येक ग्रामसभेत पाणी प्रश्नाचा ठराव करा. असे आव्हान करून  कोल्हे कारखान्याच्या वार्षिक सभेच्या आईने   ऐनवेळी  वेळेच्या विषयात हा ठराव मंजूर करून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी कोल्हे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शंकरराव कोल्हे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
सौ. पल्लवी अजित बोठे (आडसाली-करंजी), परशराम त्रंबक देवकर (पुर्वहंगामी- टाकळी), रामकिसन दादासाहेब जाधव (सुरु- खोपडी), व रामदास भाउसाहेब काटवणे (खोडवा – गोधेगांव), या सर्वाधिक उस उत्पादन घेणा-या शेतक-यांचा सत्कार करण्यांत आला. 
श्रद्धांजलीचा ठराव कारखान्याचे उपाध्यक्ष मनेश गाडे यांनी मांडला.सर्व संचालक व कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी सभासदांचे स्वागत केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषय टाळयांच्या गजरात मंजुर करण्यांत आले. मागील सभेचे इतिवृत सचिव तुळशीराम कानवडे यांनी वाचले त्यास सभासदांनी मंजुरी दिली. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार संचालक विश्वासराव महाले यांनी मानले. यावेळी पोलीस पत्रकार यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

You cannot copy content of this page