विधायक मंजुरीसाठी थोडा वेळ लागला; तरी मोठा क्रांतिकारी निर्णय- सौ स्नेहलता कोल्हे

विधायक मंजुरीसाठी थोडा वेळ लागला; तरी मोठा क्रांतिकारी निर्णय- सौ स्नेहलता कोल्हे

Legislative approval took some time; But the big revolutionary decision- Mrs. Snehalata Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onMon 25Sep24, 1.10Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याने महिलांना आता लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण मिळेल. विधायक मंजुरीसाठी थोडा वेळ लागला तरी मोठा क्रांतिकारी निर्णय असल्याचं मानलं जात आहे.असे मत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी रविवारी(२४) रोजी  युवा हिंदूराष्ट्र मंडळाचे नारी शक्ती वंदन या कार्यक्रमात केले.

सौ स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, विधायक मंजुरीमुळे आमच्या सर्व पक्षाच्या महिलांमध्ये आनंद आहे देशाच्या प्रगतीपथावर जाण्यासाठी निश्चित याचा उपयोग होणार असून महिलांना काम करण्याची संधी मिळणार आहे. जेंव्हा आपली प्रतिनिधी म्हणून एखादी महिला प्रतिनिधित्व करते, तेंव्हा महिलांचा आनंद वेगळाच असतो. राजकीय क्षेत्रात काम करताना देश व संस्कृती पुरूष प्रधान असल्याने अनेकदा पुरूषांचे वर्चस्व असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागले तो विषय गप्पांमध्ये तुमच्याशी बोललं, इथे बोलण्याची वेळ नाही. असे सांगून त्यांनी त्या विषयाला बगल दिली. ज्यावेळी महिला प्रतिनिधी व प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे येते त्यावेळी अनेकजण एकत्र येऊन खोड्या काड्या करतात. कधी कधी आपण टार्गेट होतो, आपण भावनिक असल्याने थोडा त्रासही होतो. अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. मात्र या विधेयकामुळे महिला एकजूट होणार आहेत. अनेक महिला एकत्र येतील त्यामुळे खाली खेचण्याचा पाडापाडीचा विचार कमी होऊन जाईल. असा विश्वास सौ कोल्हे यांनी व्यक्त केला. ओपन जागेवर अनेक महिलांना संधी मिळेल संख्या वाढणार आहे.

आध्यात्मत मातृ शक्तीला वंदन आहे. लक्ष्मी देवीच्या रूपाने वित्त खाते तर सरस्वती देवीच्या रूपानं शिक्षण ही महत्त्वाची खाती देवुन नारी शक्तीचा सन्मान केला आहे. महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण मिळविण्याच्या ज्या क्षणाची आम्ही वाट पहात होतो तो अनेक दिवसांचा प्रयत्न यशस्वी झाला ते ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक अखेर मंजूर झाले आहे. खासदारांनी मोठे मन केलं अनेक दिवसांचा हा प्रयत्न यशस्वी झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी बरोबरच त्यांचेही आभार मानावेच लागेल. असेही सौ. कोल्हे म्हणाल्या,


सौ स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, आम्ही अशा भारताकडे वाटचाल करत आहोत जो खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम करेल.देशात ५० टक्के महिला आहेत देशाला राज्याला पुढे घेऊन जाण्यात या सुप्त शक्तीचा उपयोग निश्चितच होणार आहे’ भाजपकडून नारी शक्तीचा झालेला हा खरा सन्मान आहे, असे त्या म्हणाल्या. यापुढे आता ३३ टक्के आरक्षणामुळे त्यांना अधिक बळ मिळणार असून महिलांची राजकारणातील संख्या कैक पटीनी वाढण्यास मदत होणार आहे, असे सौ. कोल्हे यांनी सांगितले.

यावेळी रविवारी सायंकाळी भाजपा प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांच्यासह वैशाली आढाव, विद्या सोनवणे, दीपा गिरमे, विजयी देवकर, शिल्पा रोहमारे, बोधले वहिनी पदाधिकाऱ्यांनी युवा हिंदू राष्ट्र मंडळाची सायंकाळची श्रींची आरती करून या निर्णयाचे एकमेकींना पेढे व मोतीचुर लाडू भरवून आनंदोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. महिलांनी याबद्दल गणपती बाप्पाची विशेष आरती करून देवाचे आभार मानले.तसेच त्यासाठी विशेष प्रयत्न करणारे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचेही आभार मानून त्याना यश आणि उत्तम दीर्घायुष्य मिळो यासाठी प्रार्थना करण्यात आली.

Leave a Reply

You cannot copy content of this page