कोल्हे कारखान्या’चे नावीन्यपूर्ण प्रकल्प उभारण्यास प्राधान्य :अध्यक्ष विवेक कोल्हेंची घोषणा
Priority to set up innovative projects of Kolhe Karkhanya: President Vivek Kolhe’s announcement
साखर उत्पादनासह उपपदार्थ निर्मितीवर भरEmphasis on by-products including sugar production
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 26Sep24, 18.10Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : सहकार क्षेत्रातील अग्रगण्य कोल्हे साखर कारखाना काळाची गरज ओळखून आगामी काळात साखर उत्पादनासह टीईओ, ईएमएमई, बायो ॲसिटीक ॲसिडसारखे नाविन्यपूर्ण उपपदार्थ प्रकल्प उभारण्यास प्राधान्य देणार असल्याची घोषणा कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कारखान्याच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्थानावरून केली .
विवेक कोल्हे म्हणाले, कारखान्याचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांनी भविष्यात निर्माण होणा-या खाजगीसह अन्य स्पर्धाना सामोरे कसे जायचे याचा विचार ४२ वर्षापुर्वी जाणून त्यानुरूप संजीवनीला सिध्द केले.यांच्या पश्चातही कारखान्याच्या प्रगतीचा चढता आलेख कायम ठेवत पारितोषिक मिळवण्यामध्येही सातत्य राहिले आहे. नुकताच एन एस आय चा एक्सलन्स पुरस्कार जाहीर झाला आहे.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, १९८०.८१ च्या दशकात माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी उपपदार्थ निर्मीतीसह सहवीज निर्मीती, हायट्रोजन गॅस यावर लक्ष केंदीत करून त्याचे उत्पादन घेवुन सहकारासमोर निर्माण होणा-या अडचणी सोडविल्या आहेत. आम्ही आता आसवनी प्रकल्पातून बाहेर पडणा-या सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्यापासून सीबीजी व पोटॅश खती निर्मीतीसह उस वाहतुकीत वापरल्या जाणा-या वाहनांना सीएनजी गॅसचेही काम हाती घेतले आहे. पॅरासिटामॉल औषधी उत्पादनासाठी तयार केलेल्या कार्यक्षम प्रयोगशाळेतुन संशोधनावर भर दिला आहे,त्यामुळे कारखान्यास आणखी एक उत्पन्नाचा नवीन स्त्रोत्र मिळेल.गतसाली १ कोटी ४० लाख २४ हजार इथेनॉल उत्पादन केले. उत्पादन वाढीसाठी आधुनिकतेवर भर देऊन प्रकल्प क्षमता विस्तार करणार ८० हजार तर सहवीज निर्मिती प्रकल्पात बायो गॅसवर २ मेगावॅट तर सहवीज मधुन १२ मेगावॅट असे एकूण १४ मेगावॉट वीज निर्मिती केली. आता विस्तारीकरण यशस्वीपणे चालू आहे. येत्या हंगामामध्ये हे दोन्ही विस्तारीत प्रकल्प वाढीव क्षमतेने चालविण्याचा मानस असल्याचा विवेक कोल्हे यांनी सांगितले.तर उपपदार्थ निर्मितीचा निर्णय क्रांतिकारी व दूरदृष्टीचा आहे. आसपासच्या सर्वच ऊसउत्पादकांना जास्त दर मिळण्यास कोल्हे कारखान्याचा हातभार लागेल. असेही ते म्हणाले,
यावेळी कारखान्यास मिळालेल्या राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पुरस्कारांबद्दल अध्यक्ष विवेक कोल्हे यांचा सत्कार केला.त्यास उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
Post Views:
206