मा.आ.स्नेहलता कोल्हे : कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
MA Snehalta Kolhe : Committed to all round development of Kopargaon
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSun8 Oct24, 16.00Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव :महिला आणि महिलांचे प्रश्न हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तुमच्या समस्या सोडविणे माझे कर्तव्य आहे.माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत हे कार्य अखंड सुरूच राहील. कोपरगावच्या मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शनिवारी (दि.७) रोजी सायंकाळी संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या ‘न्यू होम मिनिस्टर-खेळ रंगला पैठणीचा’ अलंकापुरीनगरी मैदानावरील या कार्यक्रमात केले.
कार्यक्रमास कलावती कोल्हे, सरिता देशमुख, मनाली कोल्हे, रेणुका कोल्हे, श्रद्धा कोल्हे. कोल्हे कुटुंबीय आदींसह सर्व वयोगटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी स्नेहलता कोल्हे यांच्या जीवनकार्यावर व त्यांनी केलेल्या विकास कामांवर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करीत, फटाक्यांच्या आतषबाजीत स्नेहलता कोल्हे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भलामोठा पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला.
गप्पा-गोष्टी, उखाणे, चित्रपट गीते, लावणी, लोकगीते, भक्तिगीते, प्रश्नोत्तरे, नृत्य, फुगा फोडणे, तळ्यात मळ्यात व इतर विविध मनोरंजक खेळ यामुळे हा कार्यक्रम उत्तरोत्तर चांगलाच रंगत गेला. स्वत: स्नेहलता कोल्हे यांनी महिलांसोबत ‘जवा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ या गाण्यावर ठेका धरला.
महिलांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, महिला मंडळ व बचत गटाचे काम करत असताना पावणेतीन हजाराहून अधिक महिला बचत स्थापन केले. महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबवले. त्यांच्यामुळे आज असंख्य महिलांचे जीवनमान सुधारले असून, त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. निरांजनातील ज्योतीप्रमाणे स्वत: अखंड तेवत राहून त्यांनी अनेकांचे जीवन प्रकाशमान केले. महिलांना मान-सन्मान मिळवून दिला,माजी मंत्री शंकरराव कोल्हे, सिंधुताई कोल्हे (माई) , बिपिन कोल्हे व कोल्हे परिवार यांच्या प्रोत्साहन व आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने विधानसभेत पोहचले संघर्ष करत अनेक विकास कामे केली.
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर करून महिलांना लोकसभा व विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार मानले.
कोपरगावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले; पण काही कोत्या मनोवृत्तीच्या लोकांनी कोर्ट केसेस केल्या, राजकीय अडथळे आणले. तरीही पाणी व इतर विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम कार्यरत राहीन. मतदारसंघातील माता-भगिनींनी व नागरिकांनी मला भरभरून प्रेम दिले. हे प्रेम मी कधीही विसरणार नाही. यापुढील काळातही मतदारांनी व माता-भगिनींनी मला अशीच साथ कायम द्यावी. आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी संघर्षाचा रस्ता निश्चितच पादाक्रांत करीन.एकीचे बळ फार मोठे आहे. स्त्री हे शक्तीचे रूप आहे. कोणतीही महिला अबला नाही. मीच राणी लक्ष्मीबाई, मीच जिजाऊ, मीच सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी संघटित होऊन आत्मविश्वासाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
क्रांती नाना मळेगावकर यांचे खुमासदार निवेदन व सूत्रसंचालन केले , प्रारंभी मिमिक्री कलाकार संदीपकुमार जाधव यांनी ‘घटकाभर बसा अन् पोटभर हसा’ हा बहारदार कार्यक्रम सादर केला.
कोपरगावात पहिल्यांदाच झालेल्या या सुंदर सोहळ्याला उदंड प्रतिसाद मिळाला.
Post Views:
115