पुरुषांनी महिलांच्या विचाराचा सन्मान करावा- सौ स्नेहलता कोल्हे
Men should respect the thoughts of women – Mrs. Snehalata Kolhe
महिला बचत गटांना २ कोटींचे कर्जवितरण 2 crore disbursement of loans to women self-help groups
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onMon9 Oct24, 18.00Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कौटुंबिक जबाबदारी चोखपणे पार पाडत असताना सामाजिक, राजकीय, अर्थकारण, उद्योग, क्रीडा, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात महिला नेत्रदीपक कामगिरी बजावत आहेत.त्याचे समाधान वाटते. पुरुषांनी महिलांच्या विचाराचा सन्मान करावा असे आवाहन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी रविवारी कलश मंगल कार्यालय येथील दोन कोटी रुपयांचे कर्ज वाटप कार्यक्रमात केले .
संजीवनी महिला बचत गट बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेतर्फे कोपरगाव मतदारसंघातील महिला स्वयंसहायता बचत गटांना बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणणाऱ्या कार्यकुशल व प्रेरणादायी नेतृत्व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते दोन कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.
यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या प. पू. सरलादीदी, संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे, संजीवनी गारमेंटच्या अध्यक्षा मोनिका पराग संधान, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा वैशाली आढाव, विद्या सोनवणे, शिल्पा रोहमारे, दीपा गिरमे, अनिता साळवे, सुवर्णा सोनवणे, हर्षा कांबळे, दीपक साळुंखे, इलियास खाटिक आदींसह विविध महिला बचत गटांच्या पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्त्या व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी स्नेहलता कोल्हे म्हणाल्या,
स्वयंसहाय्यता बचत गट हे केवळ तळागाळातील महिलांचे सक्षमीकरण करत नाहीत तर ते सामाजिक, भावनिक सौहार्द पसरवतात. आज महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा मागे नाहीत. राष्ट्रपती, केंद्रीय अर्थमंत्री अशा अनेक उच्च पदांवर तसेच प्रशासनात महिला सक्षमतेने कार्यरत आहेत. महिला बचत गटांनी महिलांना उद्योग-व्यवसायासाठी अर्थसहाय्य करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी कार्य करावे. त्यांना सदैव सर्वतोपरी सहकार्य करू, असेही त्या म्हणाल्या.
Post Views:
267