कोपरगाव पीपल्स बँकेला बँको ब्लू रिबन पुरस्कार

कोपरगाव पीपल्स बँकेला बँको ब्लू रिबन पुरस्कार

Banco Blue Ribbon Award to Kopargaon People’s Bank

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onFir6 Oct24, 16.00Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव: सहकार आणि व्यापारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोल्हापूर येथील अविज् पब्लिकेशन, पुणे येथील गॅलक्सी इन्मा या सहकारी बँक संदर्भ ग्रंथ संस्थेकडून कोपरगाव पीपल्स बँकेला बँको ब्लू रिबन २०२३ या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट बँक या विभागातून बँकेला हा पुरस्कार जाहीर झाला असून अद्ययावत बॅंकिंग सुविधांच्या साहाय्याने ग्राहकाभिमुख सेवा उपलब्ध करून देणाऱ्‍या कोपरगाव पीपल्स बँकेने या वर्षी बँको पुरस्कारावर यशाची मोहोर उमटवली आहे.

गुजरात दमण येथे गुरुवारी (५) रोजी झालेल्या कार्यक्रमामध्ये बँकेचे चेअरमन कैलासचंद ठोळे, व्हा. चेअरमन भाऊसाहेब लोहकरे व संचालक कल्पेश शहा, अतुल काले, राजेंद्र शिंगी, सत्येन मुंदडा, सुनिल बंब, सुनिल बोरा, हेमंत बोरावके यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाचे पुर्व चिफ जनरल मॅनेजर पी. के. अरोरा यांच्या हस्ते हा पुरस्कार स्विकारला.

बँकेचे चेअरमन कैलासचंद ठोळे म्हणाले की, बँकेने सहकार क्षेत्रामध्ये अद्ययावत ग्राहकाभिमुख बँकिंग सुविधा उपलब्ध करून देत आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. एनपीए शून्य टक्के राखणार्‍या बँकेने ग्राहकांना बँकिंग सेवा देण्यासाठी अद्ययावत बॅंकिंग सेवासुविधांचा अवलंब केला आहे. सरकारी आणि खासगी बॅंकांप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅप, पेटीएम, फोनपे, गुगल आदींसारख्या अत्यावश्यक सुविधा ग्राहकांसाठी सेवाही सुरू केल्या आहेत. बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून भागभांडवल रू. ६ कोटी ५७ लाख, निधी ४० कोटी ४१ लाख, ठेवी २७५ कोटी ६० लाख, गुंतवणुक १४४ कोटी ४ लाख, कर्जे १६१ कोटी ९ लाख व सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा २ कोटी ३७ लाख इतका झालेला असून बँकेला ऑडीट वर्ग “अ” प्राप्त झालेला आहे. बँकेचा सी.आर.ए.आर हा १९.८४% इतका आहे. तसेच सी. आर. आर. व एस.एल.आर. मध्ये एकदाही उल्लंघन झालेले नाही या सर्व बाबींचा विचार करून बँकेला सहकारातील नामांकीत असा हा पुरस्कार भेटला.
हा पुरस्कार बँकेच्या नावलौकीकांत भर घालणारा आहे. सदर अवार्ड हा बँकेचे सर्व संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार व कर्मचारी वर्ग यांनी वेळोवेळी घेतलेल्या कष्टामुळे व यांच्या अनमोल सहकार्यामुळे प्राप्त झालेला असुन या मध्ये सर्वाचा मोलाचा वाटा आहे असे कैलासचंद ठोळे यांनी  सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page