कोल्हे’ कारखान्याचा  बॉयलर विजयादशमीला  पेटणार

कोल्हे’ कारखान्याचा  बॉयलर विजयादशमीला  पेटणार

The boiler of Kolhe’ factory will burn on Vijayadashami

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat21 Oct24, 15.30Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोल्हे सहकारी साखर कारखान्याची (Kohle Sugar Factory) ६१ व्या गळीत हंगामाची सर्वतोपरी तयारी झाली आहे. मंगळवारी दि. २४ ऑक्टोबर विजयादशमीला बॉयलर अग्नीप्रदिपन सोहळा, बॉयलर पूजा कारखान्याचे संचालक सतीश आव्हाड व सौ वैशाली आव्हाड (Satish Awad and Mrs. Vaishali Awad ) यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे…

अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे(Bipin Kolhe), राहणार आहे. यावेळी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे (Vivek Kolhe)यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यंदा गळीत हंगामाची पूर्ण तयारी करत अधिक क्षमतेने गाळप करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी विविध मशिनरीची दुरुस्ती देखभालीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत.

ऊसतोडणीसाठी पुरेशी मजूर भरती करण्यात आली आहे. तरी सर्व ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांनी बॉयलर अग्नी प्रदिपन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष मनेष गाडे (Manesh Gade), मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार (Bajirao Sutar) व संचालक मंडळाने केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page