कोपरगावात ‘बाई पण भारी देवा’ ‘होम मिनिस्टर’ला महिलांची गर्दी

कोपरगावात ‘बाई पण भारी देवा’ ‘होम मिनिस्टर’ला महिलांची गर्दी

In Kopargaon, Bai ‘Pan Bhari Deva’, ‘Home Minister’ is crowded with women

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSun22 Oct24, 18.30Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव निमित्त ‘जागर स्त्री शक्तीचा’ कार्यक्रमात बाई पण भारी देवा’ ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमासाठी महिलांची अलोट गर्दी होती. 

अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैताली काळे यांच्या पुढाकारातून माजी आमदार अशोक काळे व आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी या नवरात्र महोत्सवात घेण्यात आलेल्या अनेक नवनवीन उपक्रमांस महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 

 या कार्यक्रमात काही मजेदार बुद्धिवर्धक व आकर्षक खेळ, प्रश्नमंजुषा, उखाणे अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला भगिनींच्या कला, गुणांना वाव दिला जातो. यावर्षी अनेक नवीन उपक्रमाबरोबरच ‘बाई पण भारी देवा’ ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

या स्पर्धेतील विजेत्या महिलांसाठी  प्रथम क्रमांक फ्रीज, द्वितीय क्रमांक एलईडी टीव्ही व तृतीय क्रमांक तीन बर्नल गॅस शेगडी सह इतर आकर्षक बक्षीस ठेवण्यात आली आहे. 

या नवरात्र उत्सवात विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांना सोमवार (दि.२३) रोजी आ. आशुतोष काळे, मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ.चैताली काळे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्याच्या पहिल्या बक्षिसांचे मानकरी कोण होणार? याबाबत महिला भगिनींमध्ये उत्सुकता पसरली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page