उदयोन्मुख गायकांना व्यासपीठ मिळाल्यास कोपरगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर जाईल – पुष्पाताई काळे  

उदयोन्मुख गायकांना व्यासपीठ मिळाल्यास कोपरगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर जाईल – पुष्पाताई काळे

If budding singers get a platform, the name of Kopargaon will go national – Pushpatai Kale

सिंगिंग स्टार ऑफ कोपरगाव‘  स्पर्धाSinging Star of Kopargaon’ Competition

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat21 Oct24, 15.20Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : उदयोन्मुख गायकांना योग्य मार्गदर्शन व योग्य व्यासपीठ मिळाल्यास कोपरगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर जाईल असा विश्वास प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांनी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या नवरात्र उत्सव जागर स्त्रीशक्तीचा या अंतर्गत सिंगिंग स्टार ऑफ कोपरगाव या कार्यक्रमात व्यक्त केला. स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

स्पर्धकांनी सादर केलेली एकापेक्षा एक सरस बहारदार नवी,जुनी मराठी व हिंदी गाणी आपल्या अद्भुत ऊर्जेने सादर करणारे कलाकार व प्रत्येक गाण्याला उपस्थित रसिकांचा टाळ्यांच्या कडकडाटात मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नियोजित दोन तासाची असणारी हि स्पर्धा तब्बल पाच तास घ्यावी लागली. या पाच तास चाललेल्या स्पर्धेत कोपरगावकरांनी सुरांची जादू अनुभवली.

यावेळी स्पर्धेतील सर्वच स्पर्धकांचे सौ. पुष्पाताई काळे यांनी कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या की,  कलाकारांचा उत्साह, त्यांच्यातील अलौकिक कला पाहून हे भविष्यात हे उत्कृष्ट कलाकार होतील. त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेवून त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध झाल्यास संगीत क्षेत्रात देखील कोपरगावचे नाव मोठे झाल्याशिवाय राहणार नाही. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ‘सिंगिंग स्टार ऑफ कोपरगाव’ हि स्पर्धा आयोजित करून गायन क्षेत्रातील हिरे शोधले आहे. यापुढे देखील अशा विविध स्पर्धा राबवून अशा कलाकारांसाठी व्यासपीठ उललब्ध करून देवू अशी ग्वाही दिली.

Leave a Reply

You cannot copy content of this page