५ टक्के मस्त माणसेच इतिहास घडवतात, बाकी इतिहास जमा होतात- उदय निरगुडकर 

५ टक्के मस्त माणसेच इतिहास घडवतात, बाकी इतिहास जमा होतात- उदय निरगुडकर 

Only 5 percent of cool people make history, the rest is accumulated – Uday Nirgudkar

पुढचे २५ वर्ष भारताचा अमृत काल The next 25 years are India’s golden age

संजीवनी अभियांत्रिकी येथे पत्रकार दिन Press Day at Sanjeevani Engineering

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Mon 8Jan 24, 16.00Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव:   मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर  यांचा कार्यकाळ १८५७  च्या युद्धाच्या आधीचा त्यावेळी तो  संक्रमण काळ होता. आज पत्रकारिता आता दोन टप्प्यात झाली आहे. एक ध्येयवादी आणि दुसरी धंदेवाईक यामुळे पत्रकारिता धोक्यात आली असतानाच  मीडिया,  सोशल मीडिया,  मोबाईल  एकाच वेळी आल्याने महत्त्व राहिले का? अस्तित्वाची स्पर्धा सुरू आहे. मात्र यात विश्वासहार्यता राहिली का? सर्वत्र विश्वास गेला, ही धोक्याची घंटा आहे , जाहिरात विरूध्द बातमी  लढा सुरू असताना तोडजोड  नावाचे  नख लागले  आणि विश्वास गेला. अच्छा पेक्षा भरोसा महत्त्वाचा, माणसं पाच प्रकारची  त्रस्त, व्यस्त, सुस्त, स्वस्त, ती ९५ टक्के असतात तर उरलेली ५ टक्के मस्त माणसं असतात आणि तिच इतिहास घडवतात बाकी इतिहास जमा होतात असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी केले.

प्रारंभी मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर व संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

संजीवनी उद्योग समूह व संजीवनी शैक्षणिक स्कूल संकुल यांच्या वतीने डॉ. उदय निरगुडकर यांचा सत्कार करताना बिपिन कोल्हे, सौ स्नेहलता कोल्हे, अमित कोल्हे, विवेक कोल्हे
संजीवनी शैक्षणिक संकुल,  महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना व संजीवनी उद्योग समूह यांच्या वतीने रविवारी (७ जानेवारी)  रोजी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. निरगुडकर बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार स्नेहलता कोल्हे या होत्या.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार डॉ उदय निरगुडकर, माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे, संजीवनी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे,  सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, संजीवनी शैक्षणिक संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे सचिव अंबादास अंत्रे हे उपस्थित होते. 
डॉ. निरगुडकर पुढे म्हणाले.लोकशाहीत विरोधक कमकुवत असतील तिथे वृत्तपत्र भुमिका महत्त्वाची असते , आज जग झपाट्याने बदलत आहे, आजचा काळ हा स्पर्धेचा आहे. त्यासाठी नियोजन हवे, चलता है वृत्ती नको. खंबीर मन हवे, घेतलेला निर्णय अंमलात आणता यायला हवा, ज्ञानलालसा हवी. जिंकण्यापेक्षा तुमची वृत्ती महत्वाची आहे. स्वप्न बघून काही झोपून जातात तर काही स्वताला झोकून देत जागृत होतात. बरेचश्या गोष्टी दृष्टिकोनावर अवलंबून असतात, तेंव्हा कायम सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.आज वृत्तपत्रांना दिशा बदलण्याची गरज आहे. वृत्तपत्र एकसारखी दिसतात मुळापर्यंत जायला हवे दिसते ती बातमी नाही, जी दिसत नाही ती बातमी सत्याच्या शोधासाठी वाटेल ते स्त्रोत, विश्वास वाढवा,स्फोटक बातमी पेक्षा संवेदनशील बातमी महत्त्वाची, हल्ली माध्यमांमध्ये आशय कमी आणि व्यवसायप्रधानता अधिक असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे माध्यमांचा आत्मा असलेली विश्वासार्हता डावावर लागली असून ती पूर्ववत मिळवण्यासाठी माध्यमांमध्ये आशयप्रधानता येणे गरजेचे आहे. त्यासाठी या काळातील पत्रकारांनी आग्रही असावे, आज घेणारे असाल, पण उद्या देणारे व्हायचं आहे असे आवाहन त्यांनी यावेळी पत्रकारांना केले.
भारत हा युनिक देश आहे. तो आमचा देश आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, ज्याचे वैविध्यपूर्ण सौंदर्य तेथील खाद्यपदार्थ आणि जीवनशैलीत सहज दिसून येते.  भारताबद्दल एक गोष्ट सांगितली जाते की दर १०० किमीवर या भागातील बोली बदलते आणि दर ३०० किमीवर भाषा बदलते.  म्हणजेच भाषिक संपत्तीच्या बाबतीत इतर जगाच्या तुलनेत खूप पुढे असलेल्या देशात आपला जन्म झाला ही अभिमानाची गोष्ट आहे. पुढचे २५ वर्ष भारताचा अमृत काल आहे.भारतातील तरूण संशोधकांमुळे नविन तंत्रज्ञान  विकसित होत आहे. त्यामुळे भारत देश हा जगात अव्वल स्थानी आपल्याला दिसेल असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 
अध्यक्षीय भाषणात सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, पत्रकार हा बदलत्या समाज मनाचा आरसा आहे. सत्यता मांडण्यासाठी विषयाची माहिती घेतली पाहिजे. नाविन्यपूर्ण धाडस करण्यासाठी प्रामाणिकता हवी, वाचन हवे,अभ्यास असेल तरच परखड मत मांडता येते.काळाप्रमाणे समाज प्रबोधन करण्याची गरज आहे. उठ सूट  कोणीही, कोणाबद्दलही,   कुठलीही बातमी देतो परंतु ही बातमी छापताना  त्या व्यक्तीचे समाजात किंवा त्या विषयात  त्याचे  किती योगदान आहे. कोणाला किती महत्त्व दयायचे,याचा विचार होत नाही.  व बातमी छापली जाते. अशी खंत त्यांनी व्यक्त केली. बातमी दिली म्हणून ती छापायची  हे दर्जा घसरत चालल्याचे लक्षण आहे. असेही त्या म्हणाल्या, राजकारण विरहीत वेगवेगळ्या विषयांवर लेखन केले पाहिजे. संवाद साधताना उथळ माहिती न लिहिता वास्तव समोर आले पाहिजे सर्वांगीण वाचन, अभ्यास हवा, देशातील नेतृत्वाबद्द्ल आदर पाहिजे. अभ्यास केला तरच पुढे जाता येईल असा सल्लाही त्यांनी यावेळेस पत्रकारांना दिला.
डॉ.उदय निरगुडकर यांनी अनेक बाबी दृष्टांत देत सांगितल्या. भाषणातील मुद्दे उदाहरणे देत, असे विनोद पेरत, नाट्यपूर्ण रीतीने सांगत, त्यांनी पत्रकारांची मने जिंकली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नालाही त्यांनी अभ्यासपूर्ण व समाधानकारक उत्तरे दिली यावेळी  पत्रकार दिनानिमित्त  डॉ. निरगुडकर यांच्या हस्ते पत्रकारांचा यशोचित सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन प्राध्यापक साहेबराव दवंगे यांनी केले. उपस्थित यांचे आभार  संजीवनी शैक्षणिक संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित  कोल्हे  यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page