पुढच्याकाळात सत्याधारित  बातमी लिहिणारे व विश्वासार्हता कायम ठेवणारी माध्यमे टिकून राहतील – सम्राट फडणीस  

पुढच्याकाळात सत्याधारित  बातमी लिहिणारे व विश्वासार्हता कायम ठेवणारी माध्यमे टिकून राहतील – सम्राट फडणीस

In the future, media that write news based on truth and maintain credibility will survive – Samrat Fadnis

पत्रकार हा जनतेचा आवाज आहे आ. आशुतोष काळेJournalists are the voice of the people. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 10Jan 24, 19.30Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : “जांभेकरांच्या काळामध्ये आणि आजच्या काळात पत्रकारिकेच्या उद्देशात बदल झाला आहे,” यापुढच्या काळात सत्याधारित बातम्या लिहिणारे, विश्वासार्हता कायम ठेवणारी माध्यमे टिकून राहातील असं मला वाटतं.”असं मत जेष्ठ पत्रकार सम्राट फडणीस  यांनी कर्मवीर काळे कारखाना व उद्योग समूहाच्या वतीने बुधवारी आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात पत्रकारांना मार्गदर्शन करताना  व्यक्त केले. अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे हे होते

प्रारंभी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर, कै. कर्मवीर शंकरराव काळे व कै सौ सुशीलामाई काळे यांच्या प्रतिमांना व्यासपीठावरील माजी आमदार अशोक काळे ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस आमदार आशुतोष काळे या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. 
सम्राट फडणीस म्हणाले दिशा देणाऱ्या पत्रकारितेने आपला मूळ  उद्देश सोडला आणि नुकसान झाले पत्रकारिता केवळ करमणूक बनवून राहिली पत्रकाराचे काम सल्ला देण्याचे नव्हे किंवा मनोरंजन करण्याचे सुद्धा नाही समाजाला दिशा देणारी महत्त्वाची बातमी लिहिणे देणे ही आपली महत्त्वाची भूमिका आहे.पत्रकारितेच्या माध्यमातून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविल्या जातात. त्याचप्रमाणे जनतेच्या अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम देखील पत्रकारितेच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे नेता आणि पत्रकार यांच्यातील नाते मित्रत्वाचे असावे  पत्रकारितेतील नवनवे बदल समजून घेणे आवश्यक आहे,
सम्राट फडणीस पुढे म्हणाले वृत्तपत्रे व इतर सर्वच माध्यमांमध्ये वेगाने बदल होत असून काही सेकंदांमध्ये बातम्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत. परंतु फक्त माहिती पोहोचविण्यापुरती पत्रकारिता करून चालणार नाही. पत्रकारिता व्यवसाय एका मर्यादेपर्यंत त्यानंतर पत्रकारिता हे सेवा व्रत असून त्याद्वारे समाजबदलाची प्रक्रिया घडून येते. ही प्रक्रिया ताकदीने घडण्यासाठी नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या पत्रकारांनी तत्व व तंत्रज्ञान यांची सांगड घातली पाहिजे तरच चांगली पत्रकारीता घडु शकते. 
आशुतोष काळे म्हणाले की, बातमी सकारात्मक किंवा नकारात्मक आली तरी  कर्मवीर काळे असो की  अशोकदादा आणि मी आम्ही कधीही पत्रकाराला याबाबत  विचारणा केली नाही. काळे परिवाराने नेहमी  पत्रकारांशी नातं जपण्याची परंपरा ठेवली आहे. पत्रकार हा समाजाचा आवाज आहे. त्याला एकतर्फी बातमी देता येत नाही हे मी जाणून आहे. बातमीचे विषय बदललेले आहेत लोकप्रतिनिधी म्हणून काम  करण्याची आमची भावना असते परंतु  त्या कामाबद्दल लोकांच्या भावना काय आहेत हे  तुम्ही पत्रकार म्हणून आमच्यापर्यंत पोहोचवतात. त्यामुळे आम्हाला दिशा मिळते चुकांची जाणीव दिल्याने प्रभावी काम करण्याची संधी मिळते.   शहर असो की तालुका पिण्याच्या पाण्याचा प्रश्न , शेती, निळवंडेसाठीचा प्रयत्न केला यात आपण मला साथ दिली यापुढे रोजगार व वीज प्रश्नावर काम करीत आहे.आपल्या बातमीतून ते लोकांपर्यंत पोहचवा, कोविड असो की सरकार बदल असो  तुम्ही मला  साथ दिली तशी यापुढेही साथ देत रहा, बातम्या देत जा, प्रेम आहे राहू द्या, अशी विनंती त्यांनी या वेळेस केली.
प्रास्ताविकात कारभारी नाना आगवण, यांनी शंकरराव काळे कर्मवीर शंकरराव काळे, माजी आमदार अशोक काळे व विद्यमान आमदार  आशुतोष काळे या तीन पिढ्यांचे पत्रकारांबरोबर असलेले संबंध यावर  स्पष्टपणे माहिती दिली. सूत्रसंचालन अरूण चंद्रे यांनी केले.शेवटी काळे कारखान्याचे  उपाध्यक्ष डॉ मच्छिंद्र बर्डे कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले यावेळी कर्मवीर  काळे कारखाना  काळे उद्योग समूहाचे सर्व संचालक पदाधिकारी अधिकारी  पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

You cannot copy content of this page