कोपरगाव विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, उपमुख्यमंत्रीअजित पवारांची  ग्वाही

कोपरगाव विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, उपमुख्यमंत्रीअजित पवारांची  ग्वाही

Deputy Chief Minister Ajit Pawar assured that the funds for Kopargaon development will not go down

कोपरगाव जिल्हयात विकासात अग्रेसर रहावा यासाठी प्रयत्नशील’ आ. आशुतोष काळे Striving to be a leader in development in Kopargaon district. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 3Jan 24, 18.20Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव मतदार संघाचा  कायापालट  करून पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल  समाधान व्यक्त करताना  यापुढे विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही,  उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी आपले शिलेदार  असलेल्या आ. आशुतोष काळे यांना ग्वाही  दिली. 

कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नप्रसंगी महत्त्वाच्या असलेल्या पाच नंबर साठवण तलावासाठी अजित पवार यांनी १३१.२४ कोटीची योजना मंजूर केली निधी दिला. त्याचबरोबर या निधीसाठी लोक वर्गणी म्हणून नगरपालिकेला १९ कोटी ६८ लाख ६० हजार रुपये निधी देण्यासाठी अनमोल सहकार्य केल्याबद्दल  आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच मुंबई येथील निवासस्थानी अजित पवार यांची  भेट घेऊन कोपरगाव शहराच्या वतीने त्यांचा सत्कार केला. यावेळेस अजित पवार यांनी आ. आशुतोष काळे यांना कोपरगावांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांच्या  कार्यालयाकडून  प्रसिद्धी पत्रकाव्दारे देण्यात आली आहे.
  जिल्हयात विकासात कोपरगाव अग्रेसर रहावा, यासाठी आपण सतत प्रयत्नशील असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page