पाचगावांचा पाणीप्रश्न मिटला; स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते जलपुजन
Water problem of five villages solved; Jalapujan by Snehalata Kolhe
विवेक कोल्हे यांनी विजबिल भरले उजनी योजना कार्यान्वितVivek Kolhe paid the electricity bill and implemented the scheme
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 10Jan 24, 19.40Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : थकीत वीज बिल भरून बंद पडलेली तालुक्यातील ओव्हरफ्लो च्या पाण्यावरील उजनी योजना माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली असून त्यांनी बुधवारी त्यांनी जलपूजन केले.
पाच गावांच्या पाणी पिण्यासाठी उभारण्यात आलेली उजनी योजना गेली अनेक वर्षापासून वीज बिल थकल्यामुळे बंद पडली होती यावर्षीच्या दुष्काळाच्या परिस्थितीचा विचार करता विवेक कोल्हे यांनी येथील ग्रामस्थांच्या आग्रहाखातर थकीत बीज बिल भरून योजना कार्यान्वित केली त्यामुळे या ठिकाणच्या मुबलक पाणीसाठ्यामुळे येथील परिसरातील पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
यावेळी बोलताना स्नेहलता कोल्हे म्हणाले गेल्या तीन पिढ्यापासून निळवंडे चे पाणी या भागात यावे यासाठी स्वर्गीय शंकरराव कोल्हे असतील बिपीन कोल्हे असतील सातत्याने लढा दिला आणि आमदार म्हणून मी स्वतः सुद्धा सातत्याने निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला. मोठा निधी मिळाला हे माझे भाग्य समजते या भागात पाणी आले त्यावेळेस अनेकांना आपले आनंदाश्रू आवरता आले नाही या भागात अजून बरेच काम करायचे आहे यासाठी मी व विवेक कोल्हे सातत्याने प्रयत्नशील आहोत. आम्हाला फक्त तुमची साथ हवी आहे.इतरत्र हिरवळ आणि आपला भाग मात्र दुष्काळाच्या झळा सोसणार हे चित्र बदलण्यासाठी माझी लढाई नेहमी सुरूअसेल निळवंडे चाऱ्यांचे प्रश्न पूर्णत्वास गेल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. विवेक कोल्हे यांचा उल्लेख करून सध्याच्या तरुण पिढीला आपण मार्गदर्शन करणार असून अधिकाधिक वेगाने आपल्या भागाच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहू यासाठी अफवा आणि अर्धसत्य माहिती वर भूमिका न घेता व्यापक निर्णय घेऊ.असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात एस. के थोरात,नानाभाऊ गव्हाणे, संपतराव दरेकर,भाजपा तालुकाध्यक्ष कैलास रहाणे,युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम पाचोरे, धोंडेवाडी उपसरपंच रोहिणी नेहे, टी.डी.संचालक बंडूभाऊ थोरात, जवळके सरपंच विजय थोरात,वाल्मीक नेहे, बहादराबाद सरपंच अश्विनी पाचोरे, प्रभाकर रहाणे,सुनील थोरात,रामनाथ गव्हाणे, बाबासाहेब थोरात ,ज्ञानदेव थोरात, बाळासाहेब काकडे,राजेंद्र कोल्हे,बाबासाहेब नेहे,गोरख दरेकर, हरिदास रहाणे,निवृत्ती दरेकर,राजेंद्र नेहे,गोरख रहाणे,महेश थोरात, परसराम शिंदे,वाल्मीक भोसले,प्रवीण घारे, तुकाराम गव्हाणे,नवनाथ भडांगे, नानासाहेब काकडे,शांताराम नेहे यासह बहादराबाद, जवळके, धोंडेवाडी, बहादरपुर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
Post Views:
175