अभ्यासिकेतून भारतासाठी भावी पिढी घडावी सेवेत यावी समर्पित व्हावी – सिद्धाराम सालीमठ
The future generation should be formed for India through the study and dedicated to the service – Siddharam Salimath
समता स्टडी पॉईंट अभ्यासिका व वाचन कक्षSamata Study Point study hall and reading room
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sat 13Jan 24, 18.30Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : पुस्तक वाचनाची गोडी कमी झाली आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या वाचनातून ज्ञानामृत मिळावे,भारताची भावी पिढी घडावी सेवेत यावी, भारतासाठी समर्पित व्हावी.यासाठी अभ्यासिकेचा उपयोग होणार असून हा उपक्रम वाखाणण्यासारखा आहे. असे गौरव उद्गार नगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात केले.
शनिवारी (१३) रोजी दुपारी दीड वाजता नगरपालिका व समता चरिटेबल ट्रस्ट यांचे संयुक्त विद्यमानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर ‘समता स्टडी पॉईंट’ अभ्यासिका व वाचन कक्ष उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले ग्रामीण भागातील यु पी एस सी एमपीएससी या स्पर्धा परीक्षेत उतरण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासिकेचा उपयोग होईल यासाठी त्यांना लागणारी पुस्तके कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देताना आज डिजिटल लायब्ररी असल्याने आजची पिढी ज्ञानग्रहण करण्याच्या बाबतीत समृद्ध आहे.अपयशातून यश मिळते मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी मला बोलवा, त्याचबरोबर कोचिंग क्लासचे शिक्षकही बोलवा, एक कार्यशाळा आयोजित करा, सोबत राहु, साथ देऊ, अडचणी येऊ देणार नाही. असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. नगर रस्त्याचे काम चालू असल्याचे त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी व समता पतसंस्था अध्यक्ष काका कोयटे यांचा टापटीप कार्यक्रम असल्याचे कौतुक केले.
प्रास्ताविकात काका कोयटे म्हणाले की, या कार्यक्रमासाठी शहरातील प्रमुख शिक्षण संस्थातील व्यक्तींना पाहुणे म्हणून बोलवले आहे पालिकेने सर्व करावे अशी जरी नागरिकांची अपेक्षा असली तरी येथील सामाजिक संस्थांचा सहभाग त्यात असावा जसे आम्ही आज अभ्यासिका सुरू केली
यापूर्वी बस स्थानक परिसर व रस्ता सुशोभीकरण अशी कामे केली आहेत बाजारपेठ फुलवण्यासाठी व्यापारी महासंघाने स्पर्धा आयोजित केली होती तसा सामाजिक संस्थांनी देखील सहभाग नोंदवावा स्वर्गीय शंकरराव काळे स्वर्गीय शंकरराव कोल्हे स्वर्गीय नामदेवराव परजणे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी संजीवनी व गोदावरी दूध संघाने विकासगंगा थोडीशी आपल्या शहरात येऊ द्या, अशी मागणी व्यासपीठावरील राजेश परजणे व सुमित कोल्हे यांच्याकडे बघून केली तर समृध्दी व एमआयडीसीचा कोपरगावकरांना काय फायदा होईल याचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी करावे असे आवाहनही काका कोयटे यावेळी केले.
संकल्पना व्यक्त करताना मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी म्हणाले आयुष्याची वाटचाल करताना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना आपण आदर्श ठेवला असल्याचे सांगितले.
सुमित कोल्हे म्हणाले, येथील शेती हा मुख्य व्यवसाय होता परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती अडचणीत आली आहे या भागाच्या उन्नतीसाठी 1980 मध्ये स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी या ठिकाणी पॉलिटेक्निक व अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले गेल्या साडेचार दशकात लाखो विद्यार्थ्यांना नोकरी देऊन स्वतःच्या पायावर उभे केले तर हजारो कुटुंबांना आर्थिक सधन केले २०२३-२४ या एका वर्षात १३५० विद्यार्थ्यांना वीस लाख रुपये वार्षिक पॅकेजवर नोकरी मिळल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता व आत्मविश्वास कमी नाही त्यांना संधी मिळाली पाहिजे हे सांगताना त्यांनी विंदा करंदीकरांचे “देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याचे हात घ्यावे” या कवितेच्या पंक्तीचे वाचन केले,
राजेश परजणे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेण्यास निवडणुकीच्या आधीची वेळ द्या, अशी विनंती केली तर काही मागण्या असल्यास आम्ही नगरला येऊन आपल्याकडे करू, पण उपजिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीला झालेच आहे तर पुढची सोय देखील आपण शिर्डीला करून दिली तर बरे होईल असेही ते म्हणाले,
यावेळी राजेश परजणे म्हणाले काका आम्ही आपलं नेतृत्व मानतो, आमच तुमच एक असताना आम्हाला बाहेर का लोटता ? त्यावर काका कोयटे लगेच म्हणाले बाहेर नाही काढत आबा आपल्याला आत ओढतो आहे यावर मात्र मोठा हशा ऽऽ पिकला…
यावेळी सोमय्या कॉलेजचे प्राचार्य बी. एस. यादव यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार असून हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे कौतुक केले.
व विद्यार्थिनी अनुपमा कोकणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केलं.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ प्रांत अधिकारी माणिकराव आहेर महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे संजीवनी शैक्षणिक स्कूलचे विश्वस्त सुमित कोल्हे समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे, सोमय्या कॉलेजचे विश्वस्त संदिप रोहमारे, गोकुळचंद विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर, गोकुळचंद विद्यालयाचे सचिव दिलीप अजमेरे, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजकुमार बंब, ज्येष्ठ नागरिक मंच सुधाभाभी ठोळे लायन क्लब अध्यक्ष सुमित भट्टड, समता पतसंस्थेचे संचालक संदिप कोयटे,सोमय्या कॉलेजचे प्राचार्य डॉ बी.एस. यादव, गंगागीर कॉलेजचे प्राचार्य डॉ रमेश सानप, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते, आधीसह मान्यवर नागरिक नगरपालिका कर्मचारी अधिकारी समता व संस्थेचे संचालक, व्यवस्थापक सचिन भट्टड, वसुली अधिकारी जनार्दन कदम आदीसह कर्मचारी उपस्थित होते.प्रभारी ग्रंथपाल म्हणून राजेंद्र शेलार, महेश थोरात हे येथे काम पाहत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना गवांदे यांनी केले तर शेवटी आभार संदीप कोयटे यांनी व्यक्त केले.
चौकट
असे आहे काका कोयटे यांच्या कल्पकतेतील”समता स्टडी पाँईट”. तिसऱ्या मजल्यावर मुली व चौथ्या मजल्यावर एकशे दहा मुला मुलींसाठी स्वतंत्र दोन प्रशस्त हॉल… भरपूर स्वच्छ प्रकाश… सरस्वती मातेची, श्री गणेशाची आकर्षक मूर्ती… पिण्यासाठी आरोचे फिल्टर पाणी…. गरम पाणी… मुलांना शिकवण्यासाठी रिटायर्ड शिक्षक…. ट्यूबलाइट चा स्वच्छ प्रकाश… पडदे … सुंदर व प्रसन्न वातावरण ….अभ्यासासाठी एकांत…. उत्कृष्ट प्रतीचे फर्निचर, टेबल खुर्च्या येथे मांडण्यात आल्या आहेत. काही वेळ विरंगुळा म्हणून संगीत ऐकण्याची सुविधाही दिली जाणार आहे मोफत मोबाईल वाय-फायची सेवा सुविधा …. या अभ्यासिकेची सकाळी नऊ ते रात्री नऊ अशी वेळ ठेवण्यात आली आहे.
Post Views:
228